आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Women Who Do Not Wear Hijab Are Raped, Says Congress Leader In Karnataka | Marathi News

हुबळी:हिजाब परिधान न करणाऱ्या महिलांवर बलात्कार होतात, कर्नाटकातील काँग्रेस नेत्याची मुक्ताफळे

हुबळी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात हिजाब न परिधान करणाऱ्या महिलांवर बलात्कार होतात, अशी मुक्ताफळे कर्नाटकातील काँग्रेस नेते जमीर अहमद यांनी उधळली आहेत. हिजाब परिधान करण्याचा उल्लेख कुराण ग्रंथात नाही, असे वक्तव्य केरळचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी नुकतेच केले होते त्यासंदर्भात जमीर बोलत होते. इस्लाममध्ये हिजाब म्हणजे पडदा. वयात आल्यानंतर मुलींनी हिजाब घालून आपले सौंदर्य झाकून ठेवलेच पाहिजे, असे सांगून जगात सर्वाधिक बलात्कार भारतात होतात. याचे कारण काय? तर त्या महिला आपला चेहरा झाकून ठेवत नाहीत, असे जमीर म्हणाले.

उर्दू घराला मुस्कानचे नाव देण्यास शिवसेनेचा विरोध
मालेगाव शहरातील उर्दू घर वास्तूला हिजाब समर्थक मुस्कान खानचे नाव देण्यास शिवसेनेने विरोध केला असून फातिमा शेख यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...