आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेस कापताना महिलेच्या डोक्यात थुंकणाऱ्या जावेद हबीब यांनी एक व्हिडिओ जारी करून माफी मागितली आहे. यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहून हबीब यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. हबीब यांच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शनेही केली.
मुझफ्फरनगर येथे झाले होते सेमिनार
वास्तविक, 3 जानेवारीला जावेद हबीब यांचा कार्यक्रम मुझफ्फरनगरच्या जदौदा येथील हॉटेलमध्ये होता. यादरम्यान त्यांनी वर्कशॉपद्वारे हेअर स्टाइलिंगच्या टिप्स दिल्या. जावेद हबीब यांनी सांगितले की, पाणी नसल्यास थुंकीने केस कापता येतात. बोलता बोलता त्यांनी डेमो म्हणून खुर्चीवर बसलेल्या महिलेच्या डोक्यावर थुंकले.
मन्सूरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हा व्हिडिओ 6 जानेवारी रोजी समोर आला, त्यानंतर तो व्हायरल झाला. पूजा गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची बागपत जिल्ह्यातील बरौत शहरातील असून ब्युटी पार्लर चालवते. या संदर्भात, 6 जानेवारी रोजी पूजाने जावेद हबीब यांच्याविरुद्ध मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 355, 504 आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतरच त्यांच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शने केली.
NCW ने या प्रकरणाची घेतली दखल
राष्ट्रीय महिला आयोग म्हणजेच NCW ने या व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आहे आणि संपूर्ण प्रकरणी यूपी पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या डीजीपींना पत्र लिहिले आहे. एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट केले की, पोलिसांनी याप्रकरणी आवश्यक ती कारवाई करावी. महिला आयोगाच्या कठोर भूमिकेनंतर जावेद हबीब यांच्या अडचणी वाढू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.