आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Workers Migration | Children Asking To Their Parents For Going To Village; Do We Go To The Village For Diwali Or Chhat?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अचानक मूळ राज्यात परतणाऱ्या मजुरांना लहान मुलांकडून विचारणा; आपण दिवाळी की छटसाठी गावी जाताेय?

नवी दिल्ली / गुरगावएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अनेक मजुरांचा फोटो घेण्यास नकार, म्हणाले - ‘जगातील कोणताही कॅमेरा आमच्या वेदना दाखवू शकत नाही’

नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर उभे असलेले मजूर माेहन झा अतिशय आनंद व उत्साहाने बिहारच्या मुझफ्फरपूरमधील आपल्या कुटुंबीयांशी फाेनवरून बाेलत हाेते. तिकिटाची व्यवस्था झाली. आता ट्रेनमध्ये जाऊ आणि लवकरच घरी पाेहाेचू, असे सांगून गदगदलेल्या स्वरात माेहन यांनी फाेन बंद केला. वडिलांकडे पाहून न राहवत जवळ उभ्या ५ वर्षीय मुलाने विचारले, पापा, आपण दिवाळी साजरी करायला जाताेय? हा प्रश्न एेकून माेहन यांचे डाेळे पाणावले. त्यांनी मुलास कडेवर घेतले. ते गुरगाव येथील साेहना येथे बांधकाम ठेकेदाराकडे काम करत हाेते.

परंतु लाॅकडाऊननंतर त्यांच्या हाताला काम नव्हते. दाेन महिने इकडून-तिकडून मदत मिळत हाेती. परंतु कठीण संघर्षानंतर जगणे आणखी कठीण झाले. तेव्हा त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या प्रश्नाबद्दल ते म्हणाले, अचानक गावी परतत असल्याने त्याच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आपण दिवाळीला जाताेय का? उन्हाळ्यात दिवाळी कशी येते? त्यातून माझे मन खट्टू झाले. यंदा आपण काेणताही सण-उत्सव साजरा करणार नाहीत हे सांगण्याचे धाडस माझ्यात नाही. घरी गेल्यावर आपल्याला नवीन कपडे, मिठाई, भेटवस्तू मिळतील, असे त्याला वाटू लागले आहे. परंतु यंदा त्याला खूप निराश करावे लागणार आहे. दाेन महिन्यांपासून आमचे परतण्याचे प्रयत्न सुरू हाेते. अखेर रेल्वेत बसण्याची संधी मिळाली. आता कुठे दिलासा वाटताेय, असे माेहन यांनी सांगितले.

अचानक घरी का जाताेय हे लहान मुलांना समजत नाही. घरी केवळ दिवाळी किंवा छटनिमित्त जाताे हे त्यांना ठाऊक असते. यापुढे कधी शहरात पुन्हा येणे हाेणारदेखील नाही ही गाेष्ट लहान मुलांना सांगू शकत नाही. व्हायरसने आमचे अनेक सण खराब केले हे मुलांना कसे सांगायचे, असे भारत बाबू नावाचे अन्य मजूर हताशपणे सांगतात. त्यांनाही चार मुले आहेत.

‘जगातील कोणताही कॅमेरा आमच्या वेदना दाखवू शकत नाही’

गुरुवारी हरियाणा व दिल्लीहून ४० हजारांहून जास्त परराज्यातील मजूर विशेष रेल्वेने बिहारच्या मुझफ्फरपूर, बरौनी, किशनगंजसाठी रवाना झाले. रेल्वे व बसची व्यवस्था असूनही लाखो मजुरांना आपला नंबर येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक मजुरांना छायाचित्र काढू देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांचे सहजोद्गार होते- ‘जगातील कोणताही कॅमेरा आमच्या वेदना दाखवू शकत नाही. जग आमच्याविषयी सहानुभूती दाखवू शकते. त्यापेक्षा जास्त काहीही नाही.’    

बातम्या आणखी आहेत...