आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • World Environment Day 2020 Special | Trees Are Getting Shorter, Younger Changing Forest Conditions Started Decades Ago

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरण संशोधन:जगभरातील झाडांची उंची आणि वय कमी होत आहे, उष्णता आणि CO2 मुळे 10 वर्षांपासून हे वाईट बदल होत आहेत

दिव्य मराठीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातील जंगलांवर झालेल्या संशोधनात मानवाला दिली चेतावनी
  • वने आणि वन्यजीवनातील मानवाच्य हस्तक्षेपाचे उदाहरण आहे कोरोनाव्हायरस

मानवाने आधीच जंगलात हस्तक्षेप केल्यानंतर झाडांची संख्या झपाट्याने कमी होत होती, परंतु आणखी एक नकारात्मक बदल दिसत आहे. आता पर्यावरण बदलत आहे. जगभरातील जंगलातील झाडांची उंची कमी होतीये आणि त्यांचे वय घटत आहे. तापमान आणि कार्बन डाय ऑक्साईड वाढत असताना, हे बदल वाढत आहेत. याची सुरुवात दशकभरापूर्वी झाली आहे.

अमेरिकेच्या पॅसिफिक नॉर्थवेस्ट नॅशनल लॅबोरेटरीने जगभरातील जंगलांवर हे संशोधन केले आहे.  आता जगातील जंगले आणि वातावरण बदलत असल्याचे संशोधनात आढळून आले. जंगलातील आग, दुष्काळ, जोरदार वारा यामुळे होणारे नुकसान जंगलांचे आयुष्यमान कमी करीत आहे आणि पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.

जुनी जंगले अधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात

संशोधनाचे प्रमुख संशोधक मॅकडॉवेल म्हणतात की हवामान बदलासह हा बदल वाढत आहे. नवीन जंगलांच्या तुलनेत जुन्या जंगलात विभिन्नता आहेत आणि ते अधिक कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात. परंतु त्यांच्यावर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. आगामी काळात आपण जे झाडे लावत आहोत त्यांच्या तुलनेत जुन्या जंगलांमध्ये जास्त प्रमाणात बदल होईल. हवामान बदल थांबविण्यासाठी फक्त दोन मोठे मंत्र आहेत. कार्बनचे शोषण आणि जैवविविधता. 

मानवाने जंगलांना विनाशाच्या टोकापर्यंत नेले

जंगलात दिसणारे बदल मानवजातीच्या कर्तृत्वाचे परिणाम आहेत. याचा परिणाम असा आहे की जगभरातील जुनी वने वेगाने नष्ट होत आहेत. संशोधकांनी याला समजण्यासाठी सॅटेलाइट इमेजचा वापर करून विश्लेषण केले असता, असा बदल मागील एका दशकापासून होत आहे. हे संपूर्ण पर्यावरणाला बदलत आहे. संशोधकांनी याची दोन मोठी कारणे सांगितली आहेत. 

पहिले कारण - मानवांचा जंगलातील वाढता हस्तक्षेप आणि दुसरे कारण नैसर्गिक संकटे - आग, कीड आणि झाडांमध्ये पसरणाऱ्या रोग. वेगाने होणारी वृक्षांची कत्तल तीन प्रकारे परिणाम करतात. पहिले, येथे लोकंसख्या वाढते. दुसरे - कार्बनचे प्रमाण वाढते आणि तिसरे - झाडे संपुष्टात येतात.

वाढत्या तापमानामुळे जंगलांचा जीव गुदमरतोय 

संशोधक मॅकडॉवेल यांच्यानुसार, वाढते तापमान आणि नैसर्गिक संकटांमुळे झाडांचा जीव गुदमरत आहे. मागील 100 वर्षांत आपण अनेक जुनी जंगली गमावली आहेत. त्यांच्या जागी, अशी झाडे उगवली आहेत जी जंगलांच्या प्रजातींशी जुळत नाहीत. या दरम्यान नवीन जंगले उदयास आली. परंतु वेगाने होणारी झाडांची कत्तल प्राणी आणि झाडे यांच्यामधील परिस्थिती बदलत आहे.

तज्ञांचे मत

झाडांची संख्या घटल्याने मानवी जीवन कठीण होईल

मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान संस्थेचे सहायक प्राध्यापक डॉ. उमेश बी. काकडे म्हणाले की, झाडे आणि जंगलांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. लोकसंख्येनुसार रिक्त असलेल्या जागेवर विविध प्रकारची झाडे लावा. हे केवळ ऑक्सिजनसाठीच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांसाठी देखील फार महत्वाचे आहे. पृथ्वीवर ऑक्सिजन आणि अन्नाचा हा एकमेव स्त्रोत आहे. जस-जसे हे नष्ट होतील, मानवाचे जगणे कठीण होईल. 

वने आणि वन्यजीवनातील मानवाच्य हस्तक्षेपाचे उदाहरण आहे कोरोनाव्हायरस

पर्यावरणवादी सुमैरा अब्दुलाली म्हणतात की, जंगल आणि वन्यजीवांमध्ये मनुष्यांचा वाढता हस्तक्षेप कोरोनाव्हायरस प्राण्यांपासून मानवांपर्यंत पोहोचण्याचे एक कारण देखील आहे. ज्याचा परिणाम जगभरात लॉकडाउनच्या रूपात दिसला. मानव आणि निसर्ग एकमेकांवर अवलंबून असल्याचे यावरून माहीत होते. यावेळी जुन्या जंगलांना वाचवणे आणि संरक्षित करण्याची आवश्यकता आहे. जर आपण वनस्पतींच्या प्रजाती गमावल्या तर बदललेल्या वातावरणाचा मानव आणि प्राण्यांवर थेट परिणाम दिसेल. 

बातम्या आणखी आहेत...