आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • World Giving Index 2021 Report Updates: India 14th Most Charitable Country In World; News And Live Updates

वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्स 2021:2020 मध्ये जगातील 300 कोटी लोकांची अनोळखींना मदत; श्रीमंत देशांच्या तुलनेत गरीब देशांतील लोकांनी दाखवले औदार्य

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • अमेरिका-ब्रिटनसारख्या देशांची क्रमवारी घसरली, अमेरिका चौथ्यावरून गेला 19 व्या स्थानावर

कोरोनाने जगातील लोकांमध्ये दानशूर वृत्ती वाढवली आहे. ब्रिटिश संस्था चॅरिटीज एड फाउंडेशनच्या वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्स २०२१ नुसार गेल्या वर्षी २०२० मध्ये जगातील ५५% प्रौढांनी म्हणजे जवळपास ३०० कोटी लोकांनी अनोळखी व्यक्तींना मदत केली. ३१% लोकांनी रोखीने दान दिले व जगातील प्रत्येक पाचव्या व्यक्तीने स्वेच्छेने समाजसेवेसाठी वेळ दिला. संस्थेने ११४ देशांत सर्व्हे केला आहे. यात अनोळखी व्यक्तीला मदत करणे, रोख देणगी व आपला वेळ काढून समाजसेवा करण्याच्या वृत्तीवरून सर्व देशांचे मूल्यांकन करण्यात आले. यासाठी गॅलपने प्रत्येक देशात कमीत कमी एक हजार जणांच्या मुलाखती घेतल्या. एकूण ११४ देशांमध्ये १.२१ लाख लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

या यादीत इंडोनेशियाला सर्वात उदार देश म्हटले आहे. येथील ८३% लोकांनी पैसे दान केेले. वेळ काढून श्रमदान वा समाजातील लोकांच्या मदत करण्यातही इंडोनेशिया (६०%) सर्वोच्च राहिला. रोखीने दान देणाऱ्यांमध्ये म्यानमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथील बौद्ध धम्माचे थेरावडा शाखेचे लोक दान देण्यात खूपच पुढे आहेत. विशेष म्हणजे श्रीमंत देशांच्या तुलनेत गरीब देशांच्या लोकांमध्ये परोपकारी वृत्ती जास्त होती.

नेहमीच पहिल्या दहात स्थान मिळवणारे अमेरिका, ब्रिटन, अायर्लंड, कॅनडा, नेदरलँड्स क्रमवारीत घसरले. पहिल्या पाचमध्ये राहणारा अमेरिका १९ व्या क्रमांकावर गेला. अनोळखींना मदत करणाऱ्या पहिल्या १० देशांमध्ये नायजेरिया, कॅमरून, झांबिया, केनिया, युगांडा, इजिप्त हे ६ देश आफ्रिकेतील आहेत. जपान या गटात अखेरच्या क्रमांकावर आहे. युरोपातील देश बेल्जियम, स्वित्झर्लंड, फ्रान्स, स्लोव्हेनिया, इटली, नेदरलँड्स आणि आइसलँडमध्येही अनोळखी लोकांना मदत करण्याची वृत्ती कमी दिसली. जपान आणि मालीसारखे श्रीमंत देश दान करण्यात खूप मागे आहेत.

भारताची मोठी झेप, ८२व्या स्थानावरून १४व्या स्थानी, समाजसेवेत सहावा
भारत या क्रमवारीत अनेक वर्षे ८२ व्या क्रमांकावर होता, मात्र २०२० मध्ये तो १४व्या क्रमांकावर पोहोचला. क्रमवारीतील वेगवेगळ्या गटांबद्दल बोलायचे तर भारत समाजसेवेसाठी वेळ देण्यात सहाव्या, रोखीने दान देण्यात ३५ व्या आणि अनोळखींच्या मदतीत ४१ व्या क्रमांकावर आहे.

टॉप-15 देश (एकूण क्रमवारी)
1.इंडोनेशिया, 2.केनिया, 3. नायजेरिया, 4. म्यानमार, 5. आॅस्ट्रेलिया, 6. घाना, 7. न्यूझीलंड, 8. युगांडा, 9. कोसोव्हाे, 10. थायलंड, 11. ताझिकिस्तान,12. बहारीन, 13. युनायटेड अरब अमिरात, 14. भारत, 15. इथिअोपिया.

बातम्या आणखी आहेत...