आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हर्मेक्टिन औषधावर WHO चा दुसरा इशारा:डब्ल्यूएचओ कोरोना उपचारात इव्हर्मेक्टिन वापराच्या विरोधात, गोव्यात एक दिवसापूर्वीच या औषधाला मिळाली परवानगी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड रुग्णांच्या उपचारासाठी इव्हर्मेक्टिनचा वापर करण्यावर इशारा दिला आहे. आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, नवीन लक्षणांकरिता एखाद्या औषधाचा वापर करताना औषधाची सुरक्षा आणि परिणामकारकता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. डब्ल्यूएचओनुसार क्लिनिकल चाचण्या व्यतिरिक्त इव्हर्मेक्टिनच्या सामान्य वापराच्या आम्ही विरोधात आहोत.

एक दिवसापूर्वीच सोमवारी गोवा सरकारने कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रौढांवर या औषधाच्या वापरास मान्यता दिली आहे. WHOच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी मंगळवारी इव्हर्मेक्टिनच्या वापराविषयी ट्विट केले. मार्चच्या सुरुवातीला, डब्ल्यूएचओने म्हटले होते की, या औषधामुळे मृत्यू कमी होणे किंवा रुग्णालयात भरती होण्याची गरज कमी पडेल असे पुरावे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

जर्मन कंपनीने देखील दिला होता इशारा
WHO पूर्वी जर्मन आरोग्य सेवा आणि लाईफ सायन्स कंपनी मेरेकने देखील या औषधाबद्दल इशारा दिला होता. मेरेक म्हणाले होते- आमचे वैज्ञानिक इव्हर्मेक्टिनच्या परिणामाच्या सर्व तथ्ये आणि अभ्यासांची तपासणी करीत आहेत. या औषधाचा कोरोनावर प्रभाव पडत असल्याचा अद्यापपर्यंत कोणताही वैज्ञानिक पुरावा सापडलेला नाही. सर्वात मोठी चिंता ही आहे की, बहुतेक स्टडीजमध्ये सुरक्षिततेच्या डेटाचा अभाव आहे.

गोवा सरकारने या औषधाच्या वापरास मान्यता दिली
10 मे रोजी गोवा सरकारने इव्हर्मेक्टिन औषधाला कोरोना संसर्गावरील उपचारासाठी मंजुरी दिली. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, कोरोनामध्ये संक्रमित रुग्णाला 5 दिवसांसाठी 12mg इव्हर्मेक्टिन देण्यात येईल. ब्रिटन, इटली, स्पेन आणि जपानमधील रूग्णांवर या औषधाचा उपयोग केल्याने रिकव्हरी वेळ कमी झाली असून मृत्यू कमी झाले आहेत. ते म्हणाले की, हे औषध कोविड संसर्गापासून संरक्षण देत नाही, परंतु रोगाची तीव्रता कमी करते. जे लोक याचा वापर करत असतील त्यांनी सुरक्षेच्या चुकीच्या भ्रमात राहू नये, त्यांनी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.

IMA ने सांगितले- फक्त 5 दिवस औषध देणे पुरेसे नाही
इंडियन मेडिकल असोसिएशन गोवाचे डॉ विनायक बुवाजी यांच्यानुसार, या औषधाचा वापर 5 दिवसांच्या कमी काळासाठी करू नये. इव्हर्मेक्टिन सुरुवातीला पहिल्या, तिसर्‍या आणि सातव्या दिवशी द्यावे. त्यानंतर हे औषध आठवड्यातून एकदा तोपर्यंत द्यावे, जोपर्यंत आजार नियंत्रणात येत नाही. केवळ 5 दिवस टॅबलेट देणे प्रभावी ठरणार नाही. त्यांनी असेही सांगितले की, या औषधाची समान मात्रा सर्व लोकांना दिली जाऊ नये. 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना 12mg आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना 18mg डोस द्यावे. आम्ही गोव्याच्या आरोग्य विभागाला यामध्ये बदल करण्यासाठी पत्र लिहू.

बातम्या आणखी आहेत...