आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • World Health Organization । WHO Chief Says । India's Record Breaking Wave । Covid 19 Cases And Deaths Heartbreaking

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या परिस्थितीमुळे WHO दुःखी:संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले - भारतात हृदयद्रावक परिस्थिती, रुग्णालय रुग्णांनी आणि स्मशान मृतदेहांनी भरलेय

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सौदीवरुन 80 टन ऑक्सिजन भारतासाठी रवाना

कोरोना महामारीमुळे भारतातील बिघडती परिस्थिती पाहता WHO ने चिंता व्यक्त केली आहे. संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात सध्या हृदद्रावक परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांचे कुटुंबीय रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनच्या व्यवस्थेसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एका आठवड्याचे लॉकडाऊन लावावे लागले यावरुन या गंभीर परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. टेड्रोस यांनी म्हटले की, भारत कोविड-19 च्या भयानक लाटेविरोधात लढाई लढत आहे. रुग्णालय रुग्णांनी भरले आहेत. स्मशानात मृतदेहांची रांग लागली आहे. हे परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदद्रावक आहे.

त्यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि ट्यूबरक्लोसिस (TB) च्या विरोधात काम करत असलेले 2600 एक्सपर्ट्सला कोरोनाविरोधात कामावर लावले आहे. WHO प्रत्येक मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. यूनाइटेड नेशन (UN) ची हेल्थ एजेंसी भारताला ऑक्सिजन कंसंट्रेटर आणि रुग्णालयांसाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा करत आहे.

जगभरात 14 कोटी 84 लाख कोरोना रुग्ण
जगात आतापर्यंत जवळपास 14 कोटी 84 लाख कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यामधून 31 लाख 33 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील श्रीमंत देश येथे लसीकरण मोहीम वेगाने करुन महामारीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतासह अमेरिका आणि जापान
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सोमवारी फोनवर चर्चा झाली. बायडेन यांनी मोदींना म्हटले - जेव्हा अमेरिका कोविड-19 मुळे अडचणीचा सामना करत होती, तेव्हा भारताने त्यांची पूर्णपणे मदत केली होती. आता अमेरिकेची बारी आहे. चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचे मदतीसाठी आभार मानले आहे. याच्या काही वेळ पूर्वीच जापानचे पंतप्रधान योशिहिदो सुगा यांनीही मोदींसोबत फोनवर चर्चा केली.

US पुरवणार कच्चा माल
बायडेन यांच्यासोबतच्या चर्चेनंतर मोदींनी सोशल मीडियावर म्हटले - आम्ही लसीचा कच्चा माल आणि औषधांची पुरवठा साखळी प्रभावी होण्यासाठी चर्चा केली. भारत आणि अमेरिकेची हेल्थकेअर पार्टनरशिप जगात कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करु शकते. आम्ही दोन्ही देशांमध्ये महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.

सौदीवरुन 80 टन ऑक्सिजन भारतासाठी रवाना
रविवारी सौदी अरबचे जावई बंदरगाह येथून 4 क्रायोजेनिक टँकमध्ये 80 टन ऑक्सिजन भारतासाठी रवाना झाला. हे लवकरच मुंद्रा बंदरगाह येथे पोहोचेल. हे अदानी समूहाच्या नेतृत्वात आणले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...