आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • World Photography Day: 10 Rare Photos Of India; View Through Photo Story. The First Aatmnirbhar Campaign In India Took Place 90 Years Ago. See First Flight Take Off And TV Inflow In Rural India

फोटोग्राफी डे निमित्र भारताचे 10 दुर्मिळ फोटो:90 वर्षांपूर्वी सुरू झाले आत्मनिर्भर अभियान, पहिल्या फ्लाइटचे टेक ऑफ आणि देशात टीव्ही येण्याच्या आनंदाचे न पाहिलेले फोटो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज जागतिक फोटोग्राफी दिवस आहे. सुमारे 194 वर्षांपूर्वी फ्रान्सचे जोसेफ नाइसफोर आणि लुइस डॉगेरने मिळून फोटोग्राफीचा शोध लावला होता. 19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रेंच सरकारने याची अधिकृत घोषणा केली होती आणि ती विनामूल्य भेट म्हणून संपूर्ण जगासाठी उपलब्ध करुन दिली. तेव्हापासून फोटोग्राफर्सनी जगातील प्रत्येक मोठे बदल, प्रत्येक आश्चर्यचकित करणाऱ्या लहान-मोठ्या घटना आपल्या कॅमेरात कैद केल्या आहेत.

फोटोग्राफीच्या दिवशी पहा काही खास कार्यक्रमांचे फोटो ज्यांनी नवीन भारत निर्मितीत मोठी भूमिका बजावली, बघा आणि शेअर करा...

1930 मध्ये नागरी अवज्ञा चळवळीच्या वेळी महात्मा गांधींनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. यानंतर देशभरात परदेशी वस्तूंची होळी पेटवण्यात आली. ठिकठिकाणी निदर्शने झाली आणि लोकांनी स्वदेशीचा अवलंब करण्याचा प्रण घेतला. याला भारतातील पहिले आत्मनिर्भर अभियान देखील म्हणता येईल.

15 ऑगस्ट 1947 रोजी जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. लॉर्ड माउंटबॅटन यांनी त्यांना शपथ दिली. त्यावेळी संसद भवन याला संविधान सभा म्हटले जात असे. 14-15 ऑगस्ट रोजी रात्री लॉर्ड माउंटबॅटन यांनी पं. नेहरू यांना शपथ दिली आणि त्यानंतर नेहरूंनी त्यांचे 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी' हे ऐतिहासिक भाषण केले.

लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ब्रिटीश ध्वज उतरवताना आणि भारताचा ध्वज फडकताना. भारताला 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र लाल किल्ल्यावर 16 ऑगस्ट रोजी पहिले ध्वजारोहण करण्यात आले होते. 15 ऑगस्ट ऐवजी तर 16 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ होती.

16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान देशातील पहिले रेल्वे धावली होती. 14 डब्यांसह असलेली ही ट्रेन दुपारी साडेतीन वाजता 21 तोफांच्या सलामीनंतर धावली होती. 33 किलोमीटरचा पहिला प्रवास करणाऱ्या या रेल्वेत 400 प्रवाश्यांनी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास केला होता. या रेल्वेला लॉर्ड लॉरेन्स कंपनीचे इंजिन बसविण्यात आले होते.

1895 मध्ये भारताला पहिले स्वदेशी रेल्वे इंजिन बनवण्यात यश आले. राजपूताना मालवा रेल्वेच्या अजमेर वर्कशॉपमध्ये याला बनवले होते. 38 टन वजनी या मीटरगेज इंजिनचे नाव एफ-374 होते.

1914 मध्ये जन्मलेली सरला ठकराल वयाच्या 21 व्या वर्षी देशातील पहिली महिला पायलट बनली. 1936 मध्ये ठकराल परंपरांना मोडून विमान चालविणारी सरला पहिली भारतीय महिला ठरली. त्यांनी एकटीने 'जिप्सी मॉथ' नावाचे विमानाचे उड्डाण केले. खास गोष्ट अशी की त्या काळात प्रथमच साडी परिधान करून विमान उडवणारी ती भारतातील पहिली महिलाही ठरली. त्यावेळी त्या चार वर्षांच्या मुलीची आईही होत्या.

भारतीय रेल्वेची पहिली इलेक्ट्रिक ट्रेन 3 फेब्रुवारी 1925 रोजी बॉम्बे व्हीटी स्टेशन ते कुर्ला दरम्यान धावली होती. तेव्हाचे बॉम्बे व्हीटी स्टेशन आता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणून ओळखले जाते. जेव्हा ही ट्रेन धावली तेव्हा हजारो लोक ट्रॅकच्या दोन्ही बाजूस दाखल झाले आणि त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते.

15 जानेवारी रोजी पंडित जवाहरलाल नेहरू आणि होमी जहांगीर भाभा यांना देशाचे पहिले संगणक दाखविणारे प्राध्यापक एम.एस. नरसिम्हन. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये बनलेल्या या कॉम्प्युटरला TIFRAC नाव दिले होते. हा एक फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर होता. हे मूळतः संशोधनाच्या कार्यासाठी विकसित केले गेले.

भारताचे पहिले विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत टाटा एअर सर्व्हिसेसचे संस्थापक जेआरडी टाटा. 15 ऑक्टोबर 1932 रोजी भारताच्या पहिल्या विमानाने कराचीहून मुंबईसाठी उड्डाण घेतले होते. हे उड्डाण भारताच्या विमान उड्डाण उद्योगाचे पायाभरणीचे ठिकाण होते, जे आज जगातील सर्वात मोठे विमान उड्डाण बाजारपेठ आहे. नंतर टाटा एअरचे राष्ट्रीयकरण करून त्याला एअर इंडिया असे नाव देण्यात आले.

भारताची पहिली स्वदेशी कार टाटा इंडिका चालवताना रतन टाटा. रतन टाटांच्या यशामध्ये या कारचे मोठे योगदान आहे. ही हॅचबॅक कार 30 डिसेंबर 1998 रोजी जीनिव्हा मोटर शोमध्ये मोठ्या उत्साहात लॉन्च करण्यात आली होती. दरम्यान ही कार 1999 मध्ये भारतीय बाजारात आली. या कारसाठी टाटा कंपनीने 'द बिग...स्मॉल कार आणि मोर कार पर कार' स्लोगन दिले होते.

हा फोटो भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांची 8 नोव्हेंबर 1949 रोजी अमेरिकेच्या प्रिन्स्टन येथे भेटीचा आहे. दोघेही एका फ्रेममध्ये असलेला हा एकमेव फोटो आहे. खरं तर, आइन्स्टाईन हे नेहरूंचे मोठे चाहते होते आणि त्यांनी आपला देश इस्राइलला मान्यता द्यावी अशी आइन्स्टाईन यांची इच्छा होती.

भारतात 15 सप्टेंबर 1959 रोजी राजधानी दिल्लीत टेलिव्हिजनची सुरुवात झाली. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (BBC) या सेवेची सुरुवात केली होती. भारतातील ग्रामीण भागात टीव्ही पोहोचवण्यासाठी 1975 मध्ये योजना बनली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील पिझ गावची निवड करण्यात आली. 1975 सालचा हा फोटो त्याच गावातला आहे.

बातम्या आणखी आहेत...