आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादैनिक भास्कर समूहाने वर्ल्ड प्रेस फ्रीडम डेनिमित्त “भास्कर जर्नलिस्ट ऑफ द इयर’ अवॉर्डची घोषणा केली आहे. ब्रेकिंग, इन्व्हेस्टिगेटिव्ह अन् दैनंदिन प्रश्नांशी संबंधित वृत्तांसाठी भास्करच्या ६ पत्रकारांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. गेल्या वर्षी या दिवशी समूहाने पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली होती. पुरस्कारप्राप्त विजेते व संक्षिप्त स्टोरी पुढील प्रमाणे...
देवेंद्र भटनागर, अहमदाबाद
गुजरातमध्ये नोकरशाहीच्या सर्जरीवर ब्रेक्रिंग न्यूज
या वर्षी २५ मार्चच्या अंकात “१५ दिवसांत ५५ ते ६० आयएएसच्या बदल्या होणार‘ शीर्षकाने प्रकाशित बातमीत नोकरशाहीतील मोठा बदल ब्रेक केला. त्यानंतर घडलेही तसेच.
मनीष पारीक, बीकानेर
लम्पीची भयावह स्थिती दाखवणारे छायाचित्र
७ सप्टें.२०२२ च्या अंकात “ धरती मातेच्या कुशीत गोमातेचा मौन चीत्कार’ शीर्षकाने प्रकाशित फोटोत दाखवले की, लम्पीमुळे मृत गायींचे मृतदेह कसे फेकले जात आहेत.
अक्षय बाजपेयी, भोपाळ
गायींच्या बांगलादेशमध्ये होणाऱ्या तस्करीचा गौप्यस्फोट
९ सप्टें. २०२२ रोजी “गायींना केळीच्या झाडात बांधून बांगलादेशात पाठवले जातेय’ या शीर्षकाच्या स्टोरीत भारत-बांगलादेश सीमेवर गायींची कशी तस्करी होतेय हे सांगितले आहे.
दिग्विजयकुमार/आलोक द्विवेदी, पाटणा
बनावट नोटांच्या तस्कर टोळीचा भंडाफोड
६ नोव्हे.च्या वृत्तात स्टिंग ऑपरेशनद्वारे भारत-नेपाळ सीमेवर २ वार्ताहर ५ दिवस बनावट नोटांच्या ३० तस्करांपर्यंत पोहोचून टोळी उघड केली.
भाविनकुमार पटेल, अहमदाबाद
सरकारी विमानाचा दुरुपयोग केला उघड
या वर्षी २३ फेब्रु.च्या अंकात सरकारी विमान व हेलिकॉप्टरमधून अजय चौहान ९ वर्षांत १०० वेळा कुटुंब-मित्रांना घेऊन फिरायला गेल्याची इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी दिली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.