आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन!:मी समजू शकतो... हे शब्द कुणाचा जीव वाचवू शकतात

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे म्हणजेच जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) जगभरातील वाढत्या आत्महत्येच्या घटनांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा करते. आकडेवारीनुसार, दरवर्षी आठ लाख लोक आत्महत्या करून आपले जीवन संपवतात. असे का होते याबद्दल अधिक माहितीसाठी आम्ही मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक निराली भाटिया यांच्याशी बातचीत केली...

प्रश्न: लोक आत्महत्या का करतात?
उत्तरः जेव्हा लोक सर्व बाजूने पराभूत होतात, निराश होतात, तेव्हाच ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. एखाद्या समस्येच्या सुरुवातीला कोणीही आत्महत्येचा विचार करत नाही. यापुढे आता आधारच उरला नाही, असे वाटल्यावर लोक आत्महत्येचा विचार करु लागतात.

प्रश्नः ही लक्षणे काय आहेत?
उत्तरः नशीबात असेल तर मिळेल, अशाप्रकारे जर कोणी सतत निराशाजनक गोष्टी बोलत असेल, आवडत्या गोष्टींपासून अंतर ठेवत असेल, वागण्यात अचानक बदल दिसत असेल, आत्महत्येवर बोलत असेल, तर ही धोक्याची घंटा असू शकते.

प्रश्‍न: मानसिक त्रास होत असताना शारीरिक लक्षणेही दिसतात का?
उत्तरः भूक न लागणे, झोप न येणे, डोके, पोट किंवा पाठीत अकारण दुखणे ही त्याची लक्षणे आहेत. हाताला हादरे बसणे, पायांची वारंवार हालचाल होणे ही देखील लक्षणे आहेत.

प्रश्न: या प्रकारच्या परिस्थितीला बळी पडलेल्या व्यक्तीसाठी आपण मित्र किंवा कुटुंब म्हणून कोणती भूमिका बजावू शकतो?
उत्तरः तुमचे नुसते बोलणे एखाद्याला आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यापासून रोखू शकते. ती व्यक्ती जे काही बोलते त्यावर क्षुल्लक उपाय सुचवण्याऐवजी तुम्ही फक्त त्याला 'मी समजू शकतो...' असे म्हणा.

बातम्या आणखी आहेत...