आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • World Water Day Drinking Water Was Free 50 Years Ago; Indians Now Buy 35 Billion Liters Of Water Every Year | Marathi News

आज जागतिक जलदिन:पेयजल 50 वर्षांपूर्वी मोफत होते; आता 1.8 लाख कोटींचा व्यवसाय, दरवर्षी 35 अब्ज लिटर पाणी खरेदी करून पिताहेत भारतीय

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाटलीबंद पाण्यात सर्वाधिक ४०% वाटा एकट्या बिस्लेरीचा

देशातील प्रत्येक गल्लीत कधीकाळी हातपंपातून मोफत मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा ५० वर्षांत १.८० लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. ट्रेड प्रमोशन काैन्सिल ऑफ इंडियानुसार, २०२३ पर्यंत हा उद्याेग ४.५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. १९६५ मध्ये जेव्हा बिस्लेरीने मुंबईनजीक ठाण्यात पहिला प्रकल्प स्थापन केला होता तेव्हा पाणी विकत घेऊन कोण पिणार, असे लोक म्हणत हाेते. मात्र, आता आपल्याला दरवर्षी ३५ अब्ज लिटरपेक्षा जास्त पाणी खरेदी करून प्यावे लागत आहे. देशात बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात ६५% हिस्सेदारी केवळ तीन कंपन्यांची आहे. यात बिस्लेरी ४०% बाजार हिश्श्यासह सर्वात पुढे आहे.

अॅक्वाफिना १५% आणि किन्ले १०% सह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९६९ मध्ये पारले-जी उत्पादक कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी ४ लाख रुपयांत बिस्लेरीची खरेदी केली होती. आज तिची मार्केट व्हॅल्यू १.५ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. कंपनी दरमहा १.५ लाख बाटली पाणी तयार करत आहे. बाटलीबंद पाणी व्यवसाय २०१९ मध्ये वार्षिक २१% वेगाने वाढला. २०२० मध्ये ३% घसरला. २०२२ मध्ये तो १८% पर्यंत जाऊ शकतो.

१.६ लि. पाण्यातून १ लि. पाणी
Q. भारतात प्रतिव्यक्ती बाटलीबंद पाण्याचा वापर किती?

- १३५ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येच्या देशात हा आकडा वार्षिक केवळ अर्धा लिटर आहे. युरोपात १११ लिटर आहे.

Q. देशात किती कंपन्या बाटलीबंद पाणी विकतात?
- सुमारे १५० कंपन्या आहेत. यात बिस्लेरी, अॅक्वाफिना, किन्ले, बेली, हिमालयन, क्वा, ऑक्सिरिच, रेल नीर, टाटा वॉटर प्लस, वेदिका व प्युअर लाइफ प्रमुख आहेत. १ लि. बाटलीबंद पाणी बनवण्यासाठी १.६ लि. पाणी लागते.

Q. बाटलीबंद पाण्याची निगराणी कशी होते ?
- कंपन्यांना बीआयएस प्रमाणपत्रासह एफएसएसएआय परवाना घ्यावा लागतो. असे असताना ७५% कंपन्या केवळ बीआयएस प्रमाणपत्रावर चालतात. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाते.

बातम्या आणखी आहेत...