आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजधानी दिल्लीमध्ये जगातील सर्वात मोठे कोव्हिड केअर सेंटर रविवारी सुरू करण्यात आले. केंटोनमेंटमध्ये बनलेल्या या अस्थायी सेंटरचे नाव सरदार वल्लभ भाई पटेल कोव्हिड-19 हॉस्पीटल ठेवण्यात आले आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या हॉस्पीटलमध्ये 250 आयसीयू बेडसह 10 हजार बेड्स आहेत.
या कोव्हिड केअर सेंटरला 11 दिवसात तयार केले आहे. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी या हॉस्पीटलचे उद्घाटन केले. यावेळी देशाचे गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. डीआरडीओचे चेअरमन जी सतीश रेड्डी आणि आयटीबीपीचे चीफ एसएस देसवालदेखील या ठिकाणी आले होते.
अनेक संघटनांनी सोबत मिळून तयार केले: राजनाथ
यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, डीआरडीओ, गृह मंत्रालय आणि टाटा सन्स अँड इंडस्ट्रीज सह अनेक संघटनांनी सोबत मिळून हे हॉस्पीटल तयार केले आहे. हे हॉस्पीटल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या दिशा-निर्देशांनुसार तयार करण्यात आले आहे. जिथे आपण कोरोना रुग्णांना चांगला उपचार देऊन आजारापासून वाचवत आहोत, तर दुसरीकडे सीमेवर सैन्य शत्रुंपासून आपले रक्षण करत आहे.
पंतप्रधनांच्या लडाख दौऱ्याने सैन्याचा आत्मविश्वास वाढला: आयटीबीपी चीफ
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान, भारत-तिब्बत सीमा पोलिस (आयटीबीपी) चीफने म्हटले की, भारतीय सैन्याचे मनोबल वाढले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जवान आपले प्राण पणाला लावत आहे. आयटीपीचे डायरेक्टर जनरल (डीजी) एसएस देसवाल म्हणाले की, पंतप्रधानांच्या लडाख दौऱ्यामुळे सैन्याचे मनोबल, त्यांचा आत्मविश्वास वाढले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.