आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एअर इंडियाचा चार महिला वैमानिकांचा चमू इतिहास घडवणार आहे. शनिवारी महिला वैमानिक जगातील सर्वात लांब हवाई मार्गासाठी उड्डाण करून उत्तर ध्रुवावरून जातील. हा चमू सॅनफ्रान्सिस्कोहून उड्डाण करेल आणि १६ हजार किमीचा प्रवास करून ११ जानेवारीला दुपारी बंगळुरूला पोहोचेल. हे नॉन स्टॉप उड्डाण असेल. एअर इंडियानुसार, उड्डाणाच्या कमांडिंग ऑफिसर कॅप्टन झोया अग्रवाल असतील. चमूत थान्मई पापागरी, आकांक्षा सोनवणे आणि शिवानी मन्हास यांसारख्या अनुभवी कॅप्टन आहेत. विमानात कार्यकारी संचालक कॅप्टन निवेदिता भसीनही उपस्थित असतील.
लहान मार्ग-मोठे आव्हान : तज्ज्ञ म्हणाले- इंधन थिजते, गुरुत्वाकर्षण जास्त असल्याने होकायंत्र काम करत नाही
सॅनफ्रान्सिस्कोहून बंगळुरूला उत्तर ध्रुवावरून येणारा मार्ग सामान्य मार्गाच्या तुलनेत खूप लहान, अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यामुळे विमान कंपन्या सर्वोत्कृष्ट आणि अनुभवी वैमानिकांनाच या मार्गावर पाठवतात. तज्ज्ञांच्या मते, ७,९०,००० चौरस मैल विस्तार असलेल्या उत्तर ध्रुवावर गुरुत्वाकर्षण जास्त असल्याने दिशांची योग्य माहिती देणारे होकायंत्र काम करत नाहीत. अशा स्थितीत विमानातील अत्याधुनिक उपकरणे आणि जीपीएसचा डेटाच वैमानिकाला मार्ग दाखववतात. तथापि, आता हायटेक होकायंत्र असल्याने हा त्रास कमी होतो. उणे ४० अंश तापमानात इंधन थिजू नये यासाठी त्यात रसायन मिसळले जाते.
उत्तर ध्रुवावर सगळीकडे बर्फ असतो. पंखांवर बर्फ साचतो, त्यामुळे पंख जड होतात. रेडिओ संकेतही अडचणी निर्माण करतात. दरम्यान, उत्तर ध्रुवावरून उड्डाण करताच झोया अग्रवाल यांच्या नावावर आणखी एका यशाची नोंद होईल. २०१३ मध्ये त्या बोइंग-७७७ विमानाचे उड्डाण करून त्या सर्वात तरुण महिला वैमानिक ठरल्या होत्या. झोया म्हणाल्या,‘मला ही संधी दिली याचा अभिमान वाटतो. कोणत्याही वैमानिकासाठी स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. महिलांवर दबाव असला तरी त्यांचा स्वत:वर विश्वास असायला हवा. त्यानंतर कुठलेही काम अशक्य नाही.’
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.