आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Write Whatever You Want On A Blank Piece Of Paper; Will Meet All Demands: Charanjit Channi | Marathi News

पंजाब:कोऱ्या कागदावर जे हवे ते लिहा; सर्व काही मागण्या पूर्ण करणार : मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चन्नींचा शब्द!

लुधियाना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायकाेटच्या विकासासाठी तुम्हाला जे हवे आहे, ते काेऱ्या कागदावर लिहा. तुमच्या सर्व काही मागण्या पूर्ण करणार आहे. तुमच्या सहकार्यातूनच रायकाेटचा कायापालट करणार आहे. तुम्ही फक्त विकासाच्या मागण्या करा, त्या मी पूर्ण करणार आहे, अशा शब्दात पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चरणजितसिंग चन्नी यांनी मतदारसंघातील आपल्या मतदारांना शब्द दिला. दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. याचदरम्यान काँग्रेस पक्षाचे राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे प्रमुख उमेदवार चरणजितसिंग चन्नीही अधिक सक्रिय झाले आहेत. त्यांनी रायकाेट येथील सभेतून आपल्या प्रचाराचा नारळ फाेडला. यादरम्यान आयाेजित प्रचार सभेत त्यांनी स्थानिक मतदारांशी संवाद साधला.

गाेडी-गुलाबीतून संवाद : काँग्रेस पक्षाने राज्यातील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यापासून चरणजीत सिंग चन्नी यांच्या वागणुकीत बदल झाला. ते सध्या अधिक प्रेम व आपुलकीने सर्वांशी संवाद साधत आहेत.

यूपी निवडणुकीत सिद्धू स्टार प्रचारक नाही, चन्नींना संधी
नवज्याेत सिद्धू यांची पुन्हा एकदा विकेट पडली आहे. मुख्यमंत्री पदाची उमेदवारी नाकारण्यात आलेल्या सिद्धू यांना पुन्हा एक धक्का देणारा निर्णय पक्षाने जाहीर केला. या निवडणुकीसाठी पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामधून सिद्धू यांना वगळण्यात आले. त्यांना उत्तराखंडच्या प्रचारकांमध्येही स्थान मिळाले नाही. यामध्ये चन्नी यांची निवड करण्यात आली. ते दाेन्ही ठिकाणी आहेत.

गत ४० वर्षांपासून सिद्धूंना आेळखताे : राहुल
मी नवज्याेत सिद्धू यांना मागील ४० वर्षांपासून आेळखत आहे. त्यांना स्वत:लाही याची कल्पना नसेल. मात्र, मी शाळेत असताना त्यांना भेटायचाे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी लुधियाना रॅलीमध्ये दिली. याठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली हाेती.

बातम्या आणखी आहेत...