आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Writer Chetan Bhagat Reacts On Pm Modi Vocal For Lock And Self Reliance Concepts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:पंतप्रधानांच्या 'व्होकल फॉर लोकल' संकल्पनेवर चेतन भगत यांनी साधला निशाणा, म्हणाले...

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आत्मनिर्भरता म्हणजे ग्राहकांना निकृष्ट उत्पादने खरेदी करण्यास भाग पाडणे नाही - चेतन भगत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजीच्या संबोधनात आत्मनिर्भर होण्याचा आणि देशात बनवलेल्या वस्तू विकत घेण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनाबाबत लेखक चेनत भगत यांनी निशाणा साधला आहे. चेतन भगत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, एखाद्याला आत्मनिर्भरतेच्या नावाखाली निकृष्ट वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. 

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "आत्मनिर्भरता म्हणजे ग्राहकांना निकृष्ट उत्पादने खरेदी करण्यास भाग पाडणे नाही तर आत्मनिर्भरतेचा अर्थ म्हणजे भारतीय उत्पादने इतके चांगले बनवा की, लोक इतर उत्पादनांऐवजी भारतीय उत्पादने निवडतील."

पंतप्रधान मोदींनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची केली होती घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी आपल्या भाषणात देशासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज घोषणा केली होती. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी हे पॅकेज जाहीर केले होते. कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपत आहे. परंतु त्यानंतरही लॉकडाऊन वाढविण्याची योजना आहे. मात्र यावेळचा लॉकडाउन वेगळा असेल.

बातम्या आणखी आहेत...