आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yas Cyclone Updates: In Bengal, Over Three Lakh Houses Collapsed, More Than One Crore People Were Hit By Yas Cyclone; News And Live Updates

ओडिशाला धडकल्यानंतर यास वादळ झाले क्षीण:बंगालमध्ये तीन लाखांवर घरांची पडझड, एक कोटीपेक्षा जास्त लोकांना फटका, दोन मृत्यू

भुवनेश्वर/कोलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बालासोरमध्ये समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळल्या. राज्यात मुसळधार पाऊस पडला.

बंगालच्या उपसागरातून घोंगवलेले “यास’ चक्रीवादळ बुधवारी सकाळी ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील बालासोर किनारपट्टीला धडकले. सकाळी ९ पासून लँडफाॅल सुरू झाला. सुमारे १०:३० ते ११:३० दरम्यान वादळ बालासोरमध्ये पोहोचले. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी १३०-१४० किमी होता. दुपारी १:३० च्या सुमारास वादळ क्षीण होऊन “अत्यंत धोकादायक’ श्रेणीतून “धोकादायक’ श्रेणीत रूपांतरित झाले. ओडिशाला धडकून वादळ झारखंडकडे सरकले. बिहारच्या २६ जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा अलर्ट आहे. दुसरीकडे, बंगालच्या जलपायगुडीत दुपारी १३:११ वाजता ३.८ तीव्रतेचा भूकंप झाला.

  • बंगालमध्येही अनेक ठिकाणी पूर आला. तीन लाखांवर घरांची पडझड झाली. १ कोटी लोकांना वादळाचा फटका बसला.
  • बालासोरमध्ये समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळल्या. राज्यात मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत.
बातम्या आणखी आहेत...