आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yashwant Sinha Could Be The Opposition's Presidential Candidate, Said About Leaving TMC, Will Be Separated For A Big Reason.

यशवंत सिन्हा होऊ शकतात विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार:TMC सोडण्याबाबत म्हणाले, मोठ्या उद्देशासाठी वेगळे होणार

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते यशवंत सिन्हा यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत सामील होण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्ष उमेदवाराचे नाव निश्चित करत असतानाच त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. या परिस्थितीत जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यशवंत सिन्हा यांचे नाव सुचवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सिन्हा यांनी लिहिले, मी ममता यांचा आभारी आहे

सिन्हा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'ममताजींनी मला टीएमसीमध्ये जो सन्मान आणि प्रतिष्ठा दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता माझ्यावर मोठ्या कारणासाठी पक्षापासून फारकत घेण्याची वेळ आली आहे जेणेकरून मी विरोधकांना एकत्र करण्याचे काम करू शकेन. मला आशा आहे की ममताजी माझे हे पाऊल स्वीकारतील.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून बड्या नेत्यांची माघार

आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनीही विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यास नकार दिला होता.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 जून

15 जूनपासून नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जून आहे. जर निवडणुका झाल्या तर त्या 18 जुलैला होतील आणि जुलैमध्येच निकाल लागेल.

बातम्या आणखी आहेत...