आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज:150 वर्षांनंतर येतोय दुर्मिळ योग; पिता सूर्याचे ग्रहण अन् त्याच दिवशी साजरी होईल पुत्र शनीची जयंती

उज्जैन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंकणाकृती असणार, अरुणाचलच्या फक्त पूर्व-उत्तर भागात सूर्यास्ताच्या वेळी अंशतः दिसेल

पिता सूर्याला ग्रहण लागेल आणि त्याच दिवशी साजरी होईल पुत्र शनीची जयंती. येत्या १० जून रोजी असा दुर्मिळ योग जवळपास १५० वर्षांनी चालून येतोय. आणखी एक योगायोग म्हणजे शनी ग्रह आपल्याच मकर राशीत वक्री आहे. या योगामुळे या वेळेला शनिजयंतीही विशेष ठरणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल व ते भारतात फक्त अरुणाचलच्या पूर्व आणि उत्तर भागातूनच सूर्यास्ताच्या वेळी अंशतः रूपात बघायला मिळेल. उर्वरित भारतावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मंदिरेही खुली राहतील.

शास्त्रानुसार शनी आपल्या मकर राशीत राहणे व शनिजयंतीच्या दिवशी मकर राशीत वक्री असलेल्या शनीसह सूर्यग्रहण दिसणे असे यापूर्वी २६ मे १८७३ रोजी झाले होते. विज्ञान प्रसारक रसिका घारू म्हणाल्या, चंद पृथ्वीपासून दूर असल्याने चंद्राची उलटी दाट सावली पृथ्वीवर पडेल. या उलट्या सावलीच्या ठिकाणाहून सूर्य कंकणाकृतीसारखा दिसेल. मध्यभागी दाट अंधार असेल, पण बाहेरची कडा बांगडीसारखी चमकेल. ग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी १.४२ पासून संध्याकाळी ६.४१ पर्यंत राहील.

ग्रहणाचा परिणाम नाही, त्यामुळे मंदिरे बंद राहणार नाहीत, ना दान-स्नान हाेईल
पं. मनीष शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जेथे ग्रहण दिसणार नाही तेथे याचा काेणताही परिणाम हाेणार नाही. म्हणजे ना मंदिरे बंद राहतील. ना स्नान- दान हाेईल. शनी सूर्याचा पुत्र अाहे. सूर्याची पत्नी छाया असल्याने शनीचा रंग काळा अाहे. ते नेहमी निळे वस्त्र परिधान करतात. मनू हे यमराज यांचे बंधू तसेच यमुना त्यांची बहीण अाहे. त्याला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २७ वर्षे लागतात. शनै: शनै: अर्थात हळूहळू चालण्यामुळे त्याला शनैश्चरदेखील म्हणतात. शनी यमराजाचे माेठे बंधू असल्याने त्याला यमाग्रजही म्हणतात.

ऑक्टोबर २०२२ चे सूर्यग्रहण देशात दिसेल
विज्ञान प्रसारक सारिका म्हणाल्या, मध्य प्रदेश आणि देशातील बहुतेक भागात सूर्यग्रहण पाहण्यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत थांबावे लागेल, ज्यामध्ये अंशत: सूर्यग्रहण एक तासापेक्षा जास्त काळ दिसू शकेल. हायब्रिड सूर्यग्रहण २० एप्रिल २०२३ रोजी होईल, परंतु ते भारतात दिसणार नाही.

शनिजयंतीच्या दिवशी काय कराल
शरीरामध्ये सांधे, त्वचा अाणि हाडांमध्ये शनीचा वास असताे. शनिवारच्या दिवशी यामध्ये विकार उत्पन्न हाेताे म्हणून या दिवशी तेलाने शरीराची मालिश केली पाहिजे. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. शनिजयंतीच्या दिवशी शनी प्रसन्न व्हावा म्हणून तेल, काळे कापड, उडीद, महिषी, करथी, काळी गाय, काळे फूल, काळे तीळ, नीलमणी, साेने अर्पण करावे.

बातम्या आणखी आहेत...