आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Yes Bank Rana Kapoor Mumbai Taloja Jail Update; Founder Of Yes Bank Arrested By Enforcement Directorate (ED)

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई:येस बँकेचे फाउंडर राणा कपूरला ED ने घेतले ताब्यात, राणा आधीपासूनच मुंबईतील तळोजा तुरुंगात बंद आहे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीने कपूरची 2203 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे

अंमलबजावनी संचालनालयाने बुधवारी मॅक स्टार पीएमसी प्रकरणात येस बँकेचे संस्थापक राणा कपूरला अटक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कपूरला जामीन देण्यास नकार दिला होता, ते मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात आरोपी आहेत. राणा कपूरला मार्च 2020 मध्ये अंम ईडीने अटक केली होती. सध्या ते मुंबईतील तळोजा तुरुंगात कैद आहेत.

सीबीआयदेखील कपूर, त्यांची पत्नी आणि तीन मुंलींविरोधात 600 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या कॉरपोरेट गवर्नेंसमध्ये गडबड केल्याच्या आरोपांची चौकशी करत आहेत. ED ने कपूरवर DHFL आणि त्याच्या ग्रुप कंपन्यांना कर्ज देताना गडबड केल्याचा आरोप लावला आहे. राणा कपूर आणि अशोक कपूरने 2004 मध्ये येस बँकेची स्थापना केली होती. बँकेचा एनपीए खूप वाढल्यानंतर मागच्या वर्षी 5 मार्चला रिजर्व बँकेने येस बँकेला आपल्या ताब्यात घेतले होते आणि बँकेचे व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त केले होते.

ईडीने कपूरची 2203 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED ने आतापर्यंत राणा कपूरची 2,203 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ED चा आरोप आहे की, राणा कपूर आणि त्याच्या कुटुंबातील इतरांनी बँकेद्वारे मोठे कर्ज देण्यासाठी लाच घेतली होती. ED ने या सर्वांना 4,300 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी बनवले आहे. या प्रकरणात ईडीने यापूर्वीच HDFL चे प्रमोटर कपिल आणि धीरज वधावनची 1400 कोटी रुपयांची संपत्ती पीएमएलए अंतर्गत जप्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...