आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yoga Guru Baba Ramdev Coronil Coronavirus Medicine Update | Patanjali Ayurved Coronil Medicine Coronavirus Ayurvedic Vaccine Latest News Updates

कोरोनीलवर बाबा रामदेव:परदेशी ड्रग माफियांनीच कोरोनीलची कुप्रसिद्धी केली, स्वदेशी औषधींच्या विरोधात द्वेष पसरवला; बाबा रामदेव यांचे स्पष्टीकरण

हरिद्वार2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने 23 जुलै रोजी कोरोनील नावाचे औषध लाँच केले. - Divya Marathi
बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने 23 जुलै रोजी कोरोनील नावाचे औषध लाँच केले.
  • 23 जून रोजी लाँच केले कोरोनील, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी लावली बंदी

कोरोनावर कथित औषध तयार करण्याचा दावा करणारे योग गुरू बाबा रामदेव आता स्वतःचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून आपल्या कथित कोरोनाविरोधी औषधींना परदेशी औषध माफियांनी बदनाम केल्याचे आरोप केले आहेत. पतंजलीने कोरोनील हे औषध काढून ते कोरोनावर उपचार करतील असा दावा केला होता. परंतु, औषध माफियांनी या औषधीचा अपप्रचार केला. तसेच स्वदेशी औषधींच्या आणि भारतीयत्वाच्या विरोधात द्वेष पसरवला जात आहे. कोरोनीलच्या कुप्रसिद्धीसाठी ड्रग माफिया आणि बहुराष्ट्रीय औषध कंपन्या जबाबदार आहेत असा दावा रामदेव यांनी केला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने 23 जुलै रोजी कोरोनील नावाचे औषध लाँच केले. हे औषध कोरोनावर उपचार करणार असल्याचा दावा करण्यात आला. परंतु, या लाँचिंगच्या 5 तासानंतर केंद्र सरकारने केंद्राने अशा कुठल्याही औषधीची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. सोबतच, चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या औषधीची मार्केटिंग आणि जाहिरात करता येणार नाही असे निर्बंध घातले. यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्यांनी कोरोनीलवर बंदी लावली.

बातम्या आणखी आहेत...