आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबांचा अ‍ॅलोपॅथीवर यू-टर्न:योगगुरू म्हणाले - लवकरच लस घेणार, सर्व चांगले डॉक्टर्स देवाने पाठवलेले दूत आहेत

नवी दिल्ली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकांनी आयुर्वेद आणि योगाही स्वीकारला पाहिजे.

अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांना सर्वात मोठे खोटे असे सांगत वादात अडकलेल्या रामदेव बाबांनी यू-टर्न घेतला आहे. त्यांनी लवकरच लस घेण्याची घोषणा केली आहे. यासोबतच म्हटले की, सर्व लोकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे. रामदेव बाबा म्हणाले की, सर्व चांगले डॉक्टर्स देवाने पाठवलेले दूत आहेत.

रामदेव बाबा म्हणाले की, लोकांनी आयुर्वेद आणि योगाही स्वीकारला पाहिजे. या दोन्ही गोष्टी आजारांविरोधात कवचचे काम करतील आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्येही कमतरता येईल.

आता बाबांनी केली डॉक्टरांची स्तुती

रामदेव बाबांनी पंतप्रधान मोदींच्या फ्री व्हॅक्सीनेशनच्या घोषणा आणि व्हॅक्सीनेशन ड्राइव्हच्या डीसेंट्रलायजेशनच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, 21 जून पासून देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण मोफत केले जाईल, पंतप्रधान मोदींनी ही ऐतिहासिक घोषणा केली आहे. आपण कोणत्याही संस्थानासोबत शत्रुत्व घेऊ शकत नाही. सर्व डॉक्टर्स देवाने पाठवलेले दूत आहेत. ही पृथ्वीसाठी भेट आहे. मात्र एखादा डॉक्टर असुनही चुकीचे काम करत असेल तर त्या व्यक्तीची चूक आहे.

बाबांनी सांगितले की, त्यांचा शत्रू कोण
पंतप्रधान जन औषधी स्टोअर उघडण्यात आले कारण ड्रग माफियांनी दुकाने उघडली आणि अनावश्यक औषधे मनमानी आणि चढ्या किंमतींमध्ये विकू लागले. ते मूलभूत आणि आवश्यक औषधे विकत नाहीत. आमचा लढा देशातील डॉक्टरांशी नाही. आम्हाला असे वाटते की औषधाच्या नावाखाली कोणालाही चिंता करावी लागू नये. अनावश्यक औषधांपासून लोकांना वाचवले जावे. आपत्कालीन घटना आणि शस्त्रक्रियांसाठी अ‍ॅलोपॅथीपेक्षा काहीच चांगले नाही, याबद्दल काहीही शंका नाही. पण आयुर्वेदाने असाध्य रोग बरे करता येतात.

बाबा रामदेवांच्या अॅलोपॅथीवर दिलेल्या वक्तव्याने वाढला होता वाद

  • नुकतेच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने योग गुरू रामदेव बाबावर अॅलोपॅथी उपचारांच्या विरोधात खोटे पसरवण्याचा आरोप लावला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलेच्या यपत्रामध्ये IMA ने म्हटले होते की, सोशल मीडियावर रामदेव बाबांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये बाबा एलोपॅथीला बकवास आणि दिवाळखोर सायन्स म्हणत आहे. यानंतर आयएमएने रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठवली. रामदेव यांच्यावर खटला चालवण्याची मागणीही डॉक्टरांच्या मंडळाने केली होती.
  • आयएमएने पत्रात लिहिले होते की यापूर्वी कोरोनासाठी बनवलेले औषध लॉन्च करण्याच्या वेळीही रामदेव यांनी डॉक्टरांना मारेकरी म्हटले होते. या कार्यक्रमात आरोग्यमंत्रीही उपस्थित होते.
  • यानंतर रामदेव बाबांची संस्था पतंजलीने हे आरोप खोटे असल्याचे सांगत निवेदन प्रसिद्ध केले होते. पतंजली म्हणाले होते की, मॉडर्न सायन्स आणि त्याची प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांविषयी बाबा रामदेव कोणतीही दुर्भावना ठेवत नाहीत. IMA ने त्यांच्यावर जे आरोप लावले आहेत, ते चुकीचे आहेत.
  • केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांननी पत्र लिहून रामदेव बाबांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. हर्षवर्धन यांनी म्हटले होते की, अॅलोपॅशीसंबंधीत हेल्थ वर्कर्स आणि डॉक्टर खूप मेहनतीने कोरोना रुग्णांचे जीव वाचवत आहेत. तुमच्या वक्तव्याने कोरोनाविरोधात सुरू असलेली लढाई कमजोर पडू सकते. आशा आहे की, तुम्ही हे वक्तव्य मागे घ्याल.
  • यावर आरोग्य मंत्र्यांच्या पत्राचे उत्तर देत रामदेव बाबा म्हणाले होते की, त्यांना हे प्रकरण शांत करायचे आहे. त्यांनी सोशल मीडियावरर लिहिले की, तुमचे पत्र मिळाले. त्याच्या संदर्भात चिकित्सा पध्दतींच्या संघर्षाच्या या संपूर्ण वादाला पूर्णविराम देतो आणि माझे वक्तव्य मागे घेतो.
  • यानंततर IMA ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रामदेव बाबांची तक्रार केली. पत्रामध्ये IMA ने म्हटले की, एका व्हिडिओमध्ये रामदेव बाबांनी दावा केला की, लसीचे दोन्हीही डोस घेतल्यानंतरही 10,000 डॉक्टर आणि लाखो लोक मारले गेले आहेत. हा एकदम चुकीचा डाटा आहे. त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपांनुसार कारवाई केली जावी. IMA नुसार, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये एकूण 1266 डॉक्टरांनी जीव गमावले.
बातम्या आणखी आहेत...