आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yogi Adityanath Arrives To Meet Prime Minister Modi, Will Report On The Work Of The Government

दिल्लीमध्ये योगी:PM मोदी आणि नड्‌डा यांना भेटले CM योगी, मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी निवडणुकीवर झाली चर्चा

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठक संपली आहे. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत योगी यांनी आपल्या चार वर्षांच्या कामाचा अहवाल पंतप्रधानांना सादर केला. याशिवाय यूपीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि पुढच्या वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबतही चर्चा केली. त्यानंतर योगी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली

6 मोठ्या बदलांची तयारी

  • पूर्वांचलला वेगळे राज्य बनवण्यावर निर्णय होऊ शकतो.
  • योगी मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार होऊ शकतो.
  • जितीन प्रसाद आणि मोदींचे निकटवर्तीय MLC एके शर्मा यांना मंत्री बनवले जाऊ शकते.
  • युपी संगठनमध्ये मोठे बदल होऊ शकतात.
  • शेतकऱ्यांसाठी योगी मंत्रिमंडळात जाट समुदायाशी संबंधित चेहरा समाविष्ट केला जाऊ शकतो.
  • नाराज आमदारांना मंत्रिमंडळ आणि महापालिकेत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

एक दिवस आधीच शाह आणि जितिन प्रसाद यांची भेट घेतली
गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गेले होते. असे सांगितले जात आहे की, योगींची भेट घेण्यापूर्वी नड्डा आणि पंतप्रधान मोदी यांनी यूपीबद्दल सुमारे दोन तास चर्चा केली. यामध्ये संघटना, सरकार आणि मंत्रिमंडळाच्या प्रस्तावासंदर्भात चर्चा झाली. कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काल रात्री उशिरा यूपी भवनमध्ये योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या दोघांमधील संवाद सुमारे एक तास चालला.

अनुप्रिया यांनीही शहा यांची भेट घेतली
अपना दल (एस)च्या अध्यक्ष आणि खासदार अनुपिया पटेल यांनी गुरुवारीच अमित शहा यांच्यासमवेत बैठक केली. सूत्रांनी भास्करला सांगितले की, अनुप्रिया यांनी अमित शहा यांच्यासमोर मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासंदर्भात प्रस्ताव दिला. याशिवाय उत्तरप्रदेशातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात पती आशिष पटेल यांचा समावेश करण्याची अट देखील ठेवली. अपना दलच्या काही नेत्यांनाही त्यांनी उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या आयोग आणि महामंडळात सदस्य बनवण्यास सांगितले. या व्यतिरिक्त जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारांविषयी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...