आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yogi Adityanath Corona: UP CM Yogi Adityanath Tests Corona Positive After CMO Staff Was Infected

योगींना कोरोना:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण, लसचा पहिला डोस घेतल्याच्या 9 दिवसानंतर संक्रमण

लखनऊ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरोनाचा पहिला डोस घेतल्याच्या 9 दिवसानंतर योगींना कोरोनाची लागण - Divya Marathi
कोरोनाचा पहिला डोस घेतल्याच्या 9 दिवसानंतर योगींना कोरोनाची लागण
  • 5 एप्रिल रोजी योगी आदित्यनाथ यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर योगींनी स्वतःला विलगीकृत केले होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, 5 एप्रिल रोजी त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. सोशल मीडियावर त्यांनी कोरोना संक्रमणाची माहिती जारी केली.

प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर केली टेस्ट

योगींनी सोशल मीडियावर जारी केलेल्या माहितीनुसार, "कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर चाचणी करून घेतली. चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असून चिकीत्सकांच्या सल्ल्यांचे पालन करत आहे. सर्वच कार्य आता व्हर्चुली करत आहे."

उत्तर प्रदेशात कोरोनाचे 95 हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनाची परिस्थिती अतिशय विकट आहे. या ठिकाणी 95 हजारांपेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड, ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर सुद्धा उपलब्ध होत नाही. इतर राज्यांप्रमाणेच उत्तर प्रदेशात सुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. मुख्यमंत्री योगींनी यापूर्वीच गुजरातमधून 25 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मागवले आहेत. तत्काळ या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.

बातम्या आणखी आहेत...