आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yogi Adityanath । Former Government Used To Spend Money On Cemeteries, But Now It Spends On Temples, Statment Of Yogi Adityanath

योगींचे वक्तव्य:आधीचे सरकार हे पैसा कब्रस्थानांवर खर्च करायचे, आता मात्र मंदिरांवर खर्च होतो, योगी आदित्यनाथ यांचे पुन्हा वादग्रस्त भाष्य

अयोध्या25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश राज्याची विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी पार पडणार आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोप त्यासह धर्माची बाजू घेतांना दिसत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा हिंदू मतदारांची दिशाभूल करण्यासाठी राज्यात आता मंदिरांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

योगी यांनी अयोध्येत पार पडलेल्या एका कार्यक्रमात पुन्हा धर्माच्या नावाने उदाहरण दिले आहे. ते म्हणाले की, "आधी सरकारचा पैसा कब्रस्थानांवर खर्च केला जात होता, आता मात्र मंदिरांवर खर्च होतो आहे." असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

बुधवारी आपल्या सरकारच्या कामाचा दाखला देतांना योगी यांनी हे भाष्य केले. आमच्या सरकारच्या काळात आम्ही मंदिराची सजावट, पुन:निर्माण यासाठी पैसा वापरला. आधीचे सरकार केवळ कब्रस्थानांभोवती कुंपणाच्या भींती तयार करण्यासाठी पैसा खर्च करायचे. अशी टीका योगी यांनी केली आहे.

बुधवारी अयोध्येमधील दिपोत्सव कार्यक्रमादरम्यान योगी यांनी जनतेला आणि मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांना संबोधित करतांना हे वक्तव्य केले. "उत्तर प्रदेशमध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल दिसतो आहे. पुर्वीचे सरकार हे सरकारी पैसा कब्रस्थानांची भींती बांधण्यासाठी खर्च करायचे. आज हाच पैसा आमची सरकार मंदिरांच्या पुन:विकासासाठी खर्च करत आहे. मंदिरांचे सुशोभिकरण करत आहे. हा आमचा आणि त्यांच्या विचारातील फरक आहे."

"ज्यांना कब्रस्थानांची काळजी होती. त्यांनी त्या ठिकाणी पैसा खर्च केला. ज्यांना धर्म आणि संस्कृतीची चिंता आहे ते सध्या पैसा धर्म आणि संस्कृतीचे जनत करण्यासाठी वापरत आहेत" अशा प्रकारे योगीनी आपल्या कामाचा दाखल देत याबद्दल भाष्य केले.

दरम्यान, यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2017 साली फतेहपुरमधील भाषणामध्ये हाच मुद्दा उपस्थित केले होता. सत्ताधारी समाजवादी पक्ष हा भेदभाव करत असल्याचा आरोप करत मोदींनी हे वक्तव्य केले होता.

“एकाद्या गावात कब्रस्थान होत असेल तर तिथे स्मशानभूमी सुद्धा झाली पाहिजे. जर रमझानच्या वेळेस भारनियमन केले जात नसेल तर दिवाळीच्या वेळेसही केले जाऊ नये. जर होळीच्या दिवशी वीज असेल तर ईदच्या दिवशीही वीज पुरवठा खंडित होता कामा नये. कोणताही भेदभाव येथे असू नये,” असे 2017 साली मोदी म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...