आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yogi Adityanath Government On Dainik Bhaskar News | Sdrf And Police Ban Water Burial Of Bodies Into Ganga River; News And Live Updates

भास्करच्या वृत्ताचा सर्वात मोठा परिणाम:यूपी सरकारने नद्यांमध्ये मृतदेह प्रवाहित करण्यास केली मनाई; केंद्र सरकारने IIT कानपुरकडे मागितला अवहाल

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारने नदी काठावरील क्षेत्रात पेट्रोलिंग वाढविण्याचा आदेश जारी केला.

गेल्या काही दिवसांपासून गंगा नदीच्या किनार्‍यावरील घाटांवर मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळून येत होते. दैनिक भास्करने या घटनेचा वारंवार पाठपुरवा केला. दरम्यान, शुक्रवारीच भास्करने 'UP मधील गंगेच्या किनारपट्टीवरील 27 जिल्ह्यांतून ग्राऊंड रिपोर्ट' प्रसिद्ध केला होता. त्यानंतर काही वेळातच उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्ह्यांतील नद्यांमध्ये मृतदेहांच्या प्रवाहित करणार्‍यावर बंदी घातली आहे.

राज्य सरकारने नदी काठावरील क्षेत्रात पेट्रोलिंग वाढविण्याचा आदेश जारी केला. दरम्यान, गस्तीची जबाबदारी एसडीआरएफ आणि पीएसीच्या वॉटर पोलिसांना देण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व पथके 24 तास यावर नजर ठेवणार असून घाटांच्या काठावर आणि नद्यांमध्ये बोटीने गस्त घालतील.

दुसरीकडे, केंद्र सरकारने आयआयटी कानपूरचे तज्ज्ञ प्रो. विनोद तारे यांच्यावर संबंधित प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याद्वारे केंद्र सरकारला गंगा नदी व तेथील सामान्य नागरिकांवर मृतदेहांचा कसा परिणाम होईल हे जाणून घ्यायचे आहे. प्रो. तारेने म्हटले की, हा चुकीचा दृष्टीकोन असून अशा घटनांवर वेळीच बंधने घालणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

1140 किमीमध्ये 2 हजाराहून अधिक मृतदेह
दैनिक भास्करच्या 30 पत्रकारांनी बिजनौर, मेरठ, मुझफ्फरनगर, बुलंदशहर, हापूर, अलीगड, कासगंज, संभल, अमरोहा, बदनयू, शाहजहांपूर, हरदोई, फर्रुखाबाद, कन्नौज, कानपूर, उन्नाव, रायबरेली, फतेहपूर, प्रयागराज, प्रतापगढ, प्रतापगढ, प्रतापगढ , प्रतापगड वाराणसी, चांदौली, गाझीपूर आणि बलिया मधील गंगेच्या काठावरील घाटांना आणि गावांना भेटी दिल्या. गंगा उत्तर प्रदेशातील 'या' जिल्ह्यांतून 1140 किलोमीटरचा प्रवास करत बिहारमध्ये प्रवेश करते. दरम्यान, सध्या यामुळे कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे. तर उर्वरित जिल्ह्यांतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समोर आले. हा ग्राऊंड रिपोर्ट पाहा...

कानपूरमध्ये 400 मृतदेहांचे सत्य आले समोर
उत्तर प्रदेशातील बड्या शहरांपैकी एक कानपूरमधील शेरेश्वर घाटाजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. भास्करच्या पत्रकारांनी स्वत: याचा तपास केला असून येथील परिस्थिती खूपच भयावह असल्याचे सांगितले आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त मृतदेहांना जमिनीत पुरलेले दिसत होते. काही मृतदेहांचे कुत्रे लचके तोडत होते तर काहींवर गरुड व कावळे बसलेले दिसले. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांची टीमही येथे पोहोचली. त्यानंतर पोलिसांकडून प्रत्येक मृतदेहावर माती टाकण्याचे काम सुरू झाले.

बातम्या आणखी आहेत...