आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएखाद्या गुंडाने एका चौकात माता-भगिनींची छेड काढली, तर दुसऱ्या चौकात पोहोचेपर्यंत पोलिस त्याला ठार करतील, असा निर्वाणीचा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना दिला आहे. ते कानपूरमध्ये VSSD कॉलेज मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
योगी म्हणाले - "एखादा गुंड एका चौकात माता-भगिनींची छेड काढतो. दुसऱ्या चौकात दरोडा टाकण्याचे धाडस करतो. पण आता असे होणार नाही. कारण CCTV कॅमेऱ्यांत त्याची प्रत्येक हालचाल कैद होईल. त्यामुळे यापुढे कुणी एका चौकात छेड काढली किंवा दरोडा टाकला तर पुढल्या चौकात पळून जाण्यापूर्वीच पोलिस त्याला ठार करतील."
सीसामऊ नाल्याचे सेल्फी पॉइंटमध्ये रुपांतर
CM योगी म्हणाले, "कानपूर स्वतःच्या उद्योगधंद्यांसाठी ओळखले जाते. काही लोकांच्या नजरा नेहमीच या शहरावर होत्या. त्यामुळे हे शहर बकाल झाले. कानपूरची ओळख मोक्षदायनी म्हणूनही झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कानपूरला येऊन गंगा नदीत मिसळणारा सीसामऊ नाला बंद केला. नाल्याचे सेल्फी पॉइंटमध्ये रुपांतर केले. कानपूर नमामि गंगे योजनेतील सर्वात क्रिटिकल पॉइंट होते. पण आज कानपूरमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगानंतर प्रयागराजमधील गंगाही आचमन लायक झाली आहे असे मी ठामपणे सागू शकतो.
मोदींनी कानपूरमध्ये मेट्रोची सुरुवात केली. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लोकार्पणासाठी मोदी लवकरच येतील. डिफेन्स कॉरिडोरचा मुख्य केंद्रबिंदू कानपूर आहे," असे योगी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी कानपूरमध्ये 387.59 कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणी व लोकापर्णही केले.
सप आमदार व काँग्रेस नेते नजरकैदेत
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी सप आमदार अमिताभ वाजपेयी यांना त्यांच्या घरात नजरकैदेत टाकले. यावर वाजपेयी म्हणाले, "पोलिस खोटे दावे पेरून आमदार इरफान सोलंकी यांची सुपारी घेऊन आले होते. मुख्यमंत्री येताच नेहमीसारखेच यावेळीही माझ्या घराबाहेर पोलिसांचा पहारा तैनात करण्यात आला. विरोधी पक्षांच्या नेत्यांना लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.
मी डेंग्यूच्या प्रकोपावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य वेधण्यासाठी त्यांना मच्छरदानी भेट देणार होतो." दुसरीकडे, काँग्रेस नेते व प्रदेश सचिव विकास अवस्थी यांनाही पोलिसांनी बर्रा-2 स्थित त्यांच्या निवासस्थानी नजरकैद केले. ते ही शहरातील डेंग्यू व मलेरियाच्या साथीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जात होते.
योगींच्या काळात 7500 एन्काउंटर, 168 जण ठार
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनची म्हणजे 20 मार्च 2017 ते 21 नोव्हेंबर 2022 पर्यंतची आकडेवारी आम्हाला मिळाली. त्यानुसार, मागील 5 वर्षांत पोलिसांनी 7500 हून जास्त एन्काउंटर केले. त्यात 168 गुन्हेगार ठार झाले. यातील 55 गुंड मुस्लिम समुदायाचे आहेत. तर 2900 हून जास्त गुंड गंभीर जखमी झाले आहेत.
ठार झालेल्या 168 पैकी 35 जणांच्या शिरावर कोणतेही बक्षीस नव्हते. याऊलट 8 जणांवर 2 लाखांचे बक्षीस होते. या चकमकींत सीओसह 14 पोलिस शहीद, तर 1100 पोलिस जखमी झाले.
यूपीत 5 वर्षांत गुंड व्यक्तींची 3954 कोटींची संपत्ती जप्त
उत्तर प्रदेश सरकारने मागील 5 वर्षांत राज्यातील गुंड प्रवृत्तीचे नेते व गँगस्टर्सची 3,954 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. या यादीत पहिल्या क्रमांकावर प्रयागराजचे बाहुबली नेते अतीक अहमद व त्यानंतर महूच्या मुख्तार अंसारींचे नाव आहे.
1- अतीकची 959 कोटींची संपत्ती जप्त
योगी सरकारने सर्वाधिक कारवाई अतीक अहमद विरोधात केली. एप्रिल 2017 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत संपत्तीची जप्ती सुरू राहिली. गत 24 ऑगस्ट रोजी अतीकच्या 3 संपत्तीवर प्रयागराज प्रशासनाने जप्तीची कारवाई केली. त्याची किंमत 76 कोटी होती. प्रशासनाने गत 2 वर्षांत 52 वेळा अतीकवर कारवाई केली. त्यांच्यावर 163 गुन्हे दाखल असून, 38 खटले सुरू आहेत. सध्या ते गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंदिस्त आहेत.
2- मुख्तार यांची 448 कोटींची संपत्ती जप्त
अतीक अहमदनंतर मुख्तार अंसारी यांच्यावर सर्वाधिक कारवाई झाली. त्यांची आतापर्यंत 448 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात मुख्तार यांच्या पत्नी, मुलगा व भावांच्याही संपत्तीचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.