आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yogi Adityanath Statment । If The Country Had Got Leadership Like Modi In 1947, India Would Have Remained The Most Prosperous And Powerful Country

योगींचे वादग्रस्त विधान:"1947 मध्ये मोदींसारखे नेतृत्व देशाला मिळाले असते तर, भारत सर्वाधिक समृद्ध आणि ताकदवान देश राहिला असता"- योगी आदित्यनाथ

लखनउ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी पार पडणार असून, त्या पार्श्वभुमीवर नेतमंडळी जनतेला वेगवेगळी आश्वासन देताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भारताला 1947 मध्ये मोदीसारखे नेतृत्व मिळाले असते तर, भारत जगातील सर्वाधिक समृद्ध देश बनला असता. असे भाष्य योगींनी केले आहे.

योगी म्हणाले की, "भारताला सध्या जी ओळख जगात मिळत आहे. ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळत आहे. कारण त्यांनी जगाला भारतीय दृष्टी दिली. 1947 मध्ये भारताकडे जर मोदींसारखे नेतृत्व असते तर आज भारत जगातील सर्वाधिक समृद्ध आणिन ताकदवान देश राहिला असता." असे वादग्रस्त विधान योगी यांनी केले आहे.

"देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यापुर्वीच्या सरकारच्या कालखंडांमध्ये भारताचा गौरव व्हावा असे एकही काम झालेले नाही. जे लोक विभाजनाचे काम करतात ते प्रत्यक्षात तालिबानीकरणाला समर्थन देण्याचे काम करत आहेत. जे लोक जिन्नाचे समर्थन करत आहेत, ते एका प्रकारे तालिबान्यांचेही समर्थन करत आहेत." असे योगी म्हणाले.

विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यांना सरदार पटेल यांचा अपमान करायचा आहे. देशात एकीकडे राष्ट्राचे नायक सरदार पटेल आहेत तर राष्ट्राचे विभाजन करणारे जिन्ना हे दुसरीकडे आहेत. ते जिन्नाचे समर्थन करतात तर आम्ही मात्र पटेलांचे समर्थन करतो. असेही योगी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...