आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Yogi Adityanath UP Update | Chief Minister Of Uttar Pradesh Life Threat Message Phone Call

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेश:मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासह 50 इमारतींना बॉम्बने उडवण्याची धमकी

लखनऊ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूपीच्या 112 व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज पाठवून देण्यात आली धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना परत एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासह 50 मुख्य इमारतींना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यात यूपी 112 ची बिल्डिंगदेखील सामील आहे. धमकी यूपी पोलिसांच्या 112 कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज पाठवून धमकी देण्यात आली आहे. यानंतर सुरक्षेखातर मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मेसेज पाठवून दिली धमकी

मेसेजमध्ये लिहीले- "आम्ही पूर्ण यूपीमध्ये धमाके करणार आणि सरकार पाहत राहील." या धमकीच्या मेजेसनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील डॉग स्क्वाडने चेकिंग केली आणि मुख्यमंत्र्या घराजवळील परिसराचीही चेकिंग सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुण्यातील दोन तरुणांना मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्यानंतर अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...