आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानातील इंग्रजी वृत्तपत्र ‘द डॉन’चे संपादक फहद हुसैन यांनी कोरोना महामारीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विटरवर योगी आणि पाकिस्तानातील इमरान खान सरकारच्या कामांची तुलना केली आणि योगींच्या कामाला इमरान यांच्या कामापेक्षा चांगले म्हटले आहे.
यूपीने काटेकोरपणे लॉकडाउनचे पालन केले, आम्ही करू शकलो नाही: फहद फहद हुसैनने एका ग्राफ ट्वीट करत लिहीले की, लक्षपूर्वक या ग्राफला पाहा. पाकिस्तानची लोकसंख्या घनता प्रती किलोमीटर उत्तर प्रदेशापेक्षा कमी आहे. यूपीने लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन केले, पण आम्ही (पाकिस्तान) नाही करू शकलो. यामुळे मृत्यूदरातील अंतर स्पष्टपणे पाहता येऊ शकते.
This graph compares Indian PM @narendramodi home state of Gujarat with PM @ImranKhanPTI home province of Punjab. Gujarat fares much worse than Punjab in tackling #COVIDー19 even though it is twice as rich & less densely populated than Punjab (1/5) pic.twitter.com/hpg6NH77Up
— Fahd Husain (@Fahdhusain) June 8, 2020
फहदने महाराष्ट्रासोबतही तुलना केली आहे. म्हटले की, यूपीमधील मृत्यूदर पाकिस्तानापेक्षा कमी आहे, तर महाराष्ट्रात जास्त आहे. आपल्याला हे माहित करुन घ्यायला हवे की, यूपीने कोणते चांगले निर्णय घेतले आणि महाराष्ट्राने घेतले नाही. पाकिस्तानातील लोकसंख्या 208 मिलियन (20.80 कोटी) आहे, तर, यूपीची लोकसंख्या 225 मिलियन (22.50 कोटी ) आहे. परंतू, पाकिस्तानपेक्षा मृत्यूदर फार कमी आहे.
यूपीत 10,536 तर पाकिस्तानात 98,943 संक्रमित
यूपी आणि पाकिस्तानची लोकसंख्या जवळ-जवळ सारखीच आहे. पण, कोरोनाच्या ग्राफमध्ये फार अंतर आहे. आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशची लोकसंख्या 22.50 कोटी आहे, तर 0.0045 टक्के लोक संक्रमित आहेत. आतापर्यंत यूपीत 10,536 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, पाकिस्तानात 98 हजार 943 लोक संक्रमित झाले आहेत. पाकिस्तानात 2,002 मृत्यू झाले आहेत, तर यूपीत आतापर्यंत 275 मृत्यू झाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.