आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सिजन टंचाई:तुम्ही (केंद्र) अंध असू शकता, आम्ही नाही : दिल्ली हायकोर्ट, दिल्लीतील ऑक्सिजन टंचाईवर सुनावले खडे बोल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राचे अाॅक्सिजन टँकर मागवण्याचाही दिला सल्ला

काेराेना महामारीत दिल्लीत अाॅक्सिजन टंचाईवरून मंगळवारीही हायकाेर्टात सुनावणी झाली. हायकाेर्टाने अाॅक्सिजनच्या तुटवड्यावरून केंद्र सरकारवर आसूड ओढले. न्यायमूर्ती विपिन सांघी आणि रेखा पल्ली यांच्या पीठाने ‘तुम्ही अंध असू शकता, आम्ही नाही,’ या शब्दांत केंद्राला सुनावले.

हायकोर्टात अॅमिकस क्युरी (न्यायमित्र) राजशेखर राव यांनी सांगितले की, दिल्लीत अनेक लोक ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडत आहेत. त्याला केंद्राकडून अतिरिक्त साॅलिसिटर जनरल चेतन शर्मांनी विराेध केला. त्याला उत्तर देताना कोर्टाने ही टिप्पणी केली. दुसरीकडे, दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरांनी कोर्टाला सांगितले की आताही दिल्लीला त्यांच्या कोट्याचा पूर्ण ऑक्सिजन मिळत नाही आहे. सुनावणीत हायकोर्टाने केंद्राला सांगितले की, ‘महाराष्ट्रात ऑक्सिजनचा वापर कमी असेल तर तेथील काही टँकर दिल्लीला पाठवले जाऊ शकतात.’ केंद्राने कोर्टाला सांगितले की, ‘आम्ही सुप्रीम कोर्टात अहवाल दाखल करत आहोत. ७०० मेट्रिक टनचा पुरवठा करायचा आहे वा इतरांचा कोटा पूर्ण करायचा आहे, या तथ्यावर आम्ही जाणार नाही.’ त्यावर हायकोर्ट म्हणाले, सुप्रीम कोर्टानेही दिल्लीला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन देण्यास सांगितले आहे, यामुळे त्यांना तितका तर मिळावाच.

ऑक्सिजन पुरवठा, टँकर्सचा योग्य वापर होत नाहीय
दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरांनी हायकाेर्टात केंद्रावर आरोप केला की ऑक्सिजनचा पुरवठा, उपलब्ध टँकर्सचा याेग्य वापर केला जात नाहीय. अॅमिकस क्युरी राजशेखर राव यांनी सल्ला दिला की, काही ठिकाणी ऑक्सिजन साठवला जाऊ शकतो. यामुळे टंचाईला तोंड देता येऊ शकेल. रक्तपेढीप्रमाणे ऑक्सिजन सिलिंडर पेढीही बनवण्याचा सल्ला दिला. यावर काम करा, असे हायकोर्टाने दिल्ली सरकारला म्हटले.

बातम्या आणखी आहेत...