आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • You Could Not Even State The Reason For The Judge's Murder, Supreme Court Slams CBI In Dhanbad Case

नवी दिल्ली:तुम्ही न्यायाधीशांच्या हत्येचे कारणही सांगू शकला नाही, धनबाद प्रकरणात सुप्रीम काेर्टाने सीबीआयला फटकारले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडच्या धनबादमधील न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येप्रकरणाी सुप्रीम काेर्टाने सीबीआयच्या अहवालावर नाराजी व्यक्त करत फटकारले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. विनीत शरण आणि सूर्यकांत यांच्या पीठाने सीबीआयला म्हटले की, ‘तुमच्या अहवालात काहीच नाही. तुम्ही काय केले? अहवालात हत्येचे कारणही सांगितले गेले नाही. जेव्हा की आम्हाला तुमच्याकडून ठोस माहितीची अपेक्षा होती.’

न्यायाधीशांच्या हत्या प्रकरणाच्या सुप्रीम कोर्टाने झारखंड हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना तपासावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच सीबीआयने दर आठवड्याला आपला साप्ताहिक तपास अहवाल झारखंड उच्च न्यायालयाकडे सादर करावा, असे आदेश दिले.

काहीतरी ठोस सांगा
सॉलिसिटर जनरल यांनी आरोपींची चौकशी केल्याचा हवाला देत त्याचा खुलासा करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, ‘आम्हाला तुमच्याकडून झाडाझडती केल्याविषयी जाणून घ्यायचे नाही. तुम्ही अहवालात हत्येच्या उद्देशाविषयी सांगितलेले नाही. काहीतरी ठोस सांगा.’

बातम्या आणखी आहेत...