आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चापट मारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई:छत्तीसगडच्या CM ने रणबीर शर्माला सूरजपूर जिल्हाधिकारी पदावरून हटवले; युवकाला मारहाण करत फोडला होता मोबाइल

सूरजपूर(छत्तीसगड)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलेक्टरने पोलिसांना त्या तरुणास मारण्यास सांगितेल

छत्तीसगड राज्यातील सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांच्या दादागीरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ते शनिवारी पोलिसांसोबत शहरात लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी फिरत होते. दरम्यान, त्यांनी एका युवकाला मारहाण करत त्याचा मोबाईल रस्त्यावर फोडला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री बघेल यांनी त्या जिल्हाधिकारीला पदावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

पोलिसांनाही केली होती मारहाण

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनीदेखील त्या तरुणाला काठीने मारहाण केली. जिल्हाधिकारी रणबीर शर्माने त्या तरुणाला बाहेर फिरण्याचे विचारले. पण, त्या तरुणाचे कारण जिल्हाधिकारी महोद्यांना आवडले नाही. यानंतर त्यांनी त्या तरुणाचा मोबाईल रस्त्यावर आपटून फोडला नंतर त्याच्या थोबाडीत मारली आणि इतक्यावरच न थांबता पोलिसांनाही त्या तरुणास मारण्यास सांगितले.

व्हिडिओत दिसत आहे की, कलेक्टर पोलिसांना म्हणतात- तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर पोलिसांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. यावेळी तो तरुण गयावया करत म्हणतो- देवा शपत सांगतोय, ही पावती पाहा. मी कोरोना चाचणी करण्यासाठी बाहेर आलो होतो. मी तुमची रेकॉर्डिंग केलीच नाही. यानंतर त्याच्यावर एफआयआर दाखल करा, असे म्हणून कलेक्टर तेथून निघून जातात.

व्हिडिओ प्रचंड व्हायरल

घटनेचा व्हिडिओ समोर येताच लोकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घमंड आल्याचे म्हटले. तर, अनेकांनी त्यांच्या या कृत्याला चुकीचे म्हटले. छत्तीसगडसह इतर राज्यांमध्येही या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी शर्मा यांनी त्या व्हिडिओला एडीटेट म्हटले आहे. ते म्हणाले की, फक्त मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. पण, त्यापूर्वी तो तरुण उलट सुलट उत्तर देऊ लागला.

बातम्या आणखी आहेत...