आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Young Man Catches Big Crocodile In Bundi, Rajasthan, To Be Honoured For Bravery On Independence Day

राजस्थान:1 महिन्यापासून वन विभागाला हुलकावणी देणाऱ्या मगरीला एका तरुणाने पकडले, शौर्याचे होत आहे कौतुक

बूंदीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानातील बूंदी जिल्ह्यातील गुडली गावातील लोक एका तरुणाला खांद्यावर भली मोठी मगर टाकून फिरताना पाहून हैराण झाले. ज्या मगरीला वन विभाग एका महिन्यापासून पकडू शकला नाही, त्या मगरीला गावातील महेंद्र सिंह हाडा नावाच्या तरुणाने पकडले.

गुडली ग्राम पंचायत क्षेत्रातील तळ्यात अनेक दिवसांपासून एक मगर वास्तव्यास होती. मागील काही दिवसांपासून ही मगर पाळीव जनावरांची शिकार करू लागली. यानंतर गावातील नागरिकांनी वन विभागाकडे तक्रार केली. वन विभागाने प्रयत्न करुनही मगरीला पकडू शकले नाही.

यानंतर गुडली गावातील तरुण महेंद्र सिंह हाडाने या मगरीला पकडण्याचेा निश्चय केला. यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ तळ्यावर जाऊन मगरीची वाट पाहू लागला. अखेर त्याला मगर दिसली आणि दिसता क्षणी पाण्यात उडी मारुन महेंद्र सिंह हाडाने मगरीला पकडले. या दृष्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तळ्यावर मोठी गर्दी केली होती. महेंद्रच्या या शौर्याचे कौतुक करण्यासाठी येत्या 15 ऑगस्टला त्याचा जाहीर सत्कार ठेवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...