आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Young Man Died While Dancing In Bareilly UP । Death During Dance Was Captured In The Video ।Video Viral In Social Media

बर्थडेमध्ये डान्स करताना तरुणाला आला हार्ट अटॅक:मित्रांच्या आग्रहाखातर पार्टीत करत होता डान्स, अचानक कोसळला

बरेली (उत्तर प्रदेश)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बरेलीमध्ये एका बर्थडे पार्टीत नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांना काही काळ हा तरुण वावरत असल्याचे जाणवले, मात्र तो थोडावेळ उठला नाही तेव्हा लोक जवळ पोहोचले. त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहून लोकांनी त्याला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैस ग्रँड हॉटेलची आहे.

हा फोटो प्रभात कुमार डान्स करतानाचा आहे. गुरुवारी त्यांनी वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती.
हा फोटो प्रभात कुमार डान्स करतानाचा आहे. गुरुवारी त्यांनी वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती.

हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रभात कुमार डान्स करत आहेत. 45 वर्षीय प्रभात बरेली आयव्हीआरआय लॅबमध्ये सहायक टेक्निकल पदावर कार्यरत होते. या प्रयोगशाळेत प्राण्यांचे पोस्टमॉर्टम केले जाते. गुरुवारी रात्री प्रभात हे प्रेमनगर येथील हॉटेल जैस ग्रँडमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेले होते.

त्यांना डान्सची खूप आवड होती, असं सांगण्यात येत आहे. पार्टीदरम्यानच मित्रांनी प्रभात यांना त्यांच्या आवडत्या गाण्यावर डान्स करण्याची विनंती केली. यावर ते स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि डान्स करू लागले.

हा फोटो इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI) मध्ये कार्यरत प्रभात (45) यांचा आहे. ते त्यांचे मित्र मनीषच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला गेले होते.
हा फोटो इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI) मध्ये कार्यरत प्रभात (45) यांचा आहे. ते त्यांचे मित्र मनीषच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला गेले होते.

डान्सला सुरुवात केल्याच्या एका मिनिटानंतरच प्रभात जमिनीवर कोसळले, तेव्हा ते नाचत होते. सुरुवातीला लोकांना वाटले की त्यांचे पडणे हादेखील डान्सचाच एक भाग आहे, परंतु काही सेकंदानंतरही ते उठले नाहीत तेव्हा त्यांचे मित्र त्यांच्याकडे धावले. पूर्णपणे तंदुरुस्त असलेला प्रभात बॅडमिंटनपटूही होते, असे सांगितले जात आहे. बॅडमिंटन खेळून ते या पार्टीत पोहोचले होते.

गोविंदाच्या चित्रपटातील गाण्यांवर करत होते डान्स

व्हिडिओमध्ये प्रभात गोविंदा आणि सुष्मिता सेन यांच्या क्यूंकी मैं झूठ नहीं बोलता या चित्रपटातील "मुझको हाय-फाय लुगाई चाहिये..." गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. डान्स केल्यानंतर ते अचानक जमिनीवर कोसळले.

पार्टीत उपस्थित असलेले प्रभात यांचे मित्रही त्यांच्या डान्सचे व्हिडिओ बनवत होते. मित्रांना त्यांचा डान्स खूप आवडला, पण आपण आज आपल्या मित्राचा अखेरचा डान्स पाहतोय हे कुणाच्याही मनात नव्हते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रभात यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

बातम्या आणखी आहेत...