आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकडांसोबत सेल्फी काढणे बेतले जीवावर:तरुणाचा 500 फूट खोल दरीत पडून मृत्यू; सह्याद्री रेस्क्यू टीमने मृतदेह काढला बाहेर

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माकडांसोबत सेल्फी काढण्याच्या नादात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. तसेच ही घटना वरंधा घाट रोडवर मंगळवारी सायंकाळी घडली.

पोलिसांनी स्थानिक सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ( 04 जानेवारीला) त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

काय आहे घटना?

भोर पोलिस ठाण्याचे निरीक्षण विठ्ठ्ल दबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दूल शेख (वय -39) असे मृताचे नावे आहे. मंगळवारी अब्दुल शेख कारने कोकणात जात असताना वाटेत वाघजाई मंदिराजवळ माकडे दिसली असताना त्याने माकडांसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. परंतू तोल गेल्याने 500 फूल खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

बुधवारी सकाळी स्थानिक सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान अब्दुल शेख याचा मृतहेद पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनाही देण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...