आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आज देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा, आंतरजातीय विवाहावर कायदे तयार केले जात आहेत. खरे तर भारताला त्यापुढे जाण्याची गरज आहे. आजच्या तरुणाला नोकरी, तर लोकांना शांती, सुरक्षा आणि आपल्या मुलांना चांगले वातावरण मिळावे असे वाटते, असे मत काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले. सचिन इन्क्वायरी प्लॅटफॉर्मवर त्यांनी शोमा चौधरी यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. या चर्चेतील प्रमुख अंश..
सात वर्षांपासून विरोधात आहोत, सत्तेवर असो की विरोधात टीकेची धनी
काँग्रेस पक्ष आता बुडू लागलाय?
असे नाही. मी देशभर प्रवास केलाय. राजस्थान फिरलोय. केंद्र सरकारमध्ये काय होत आहे हे लोक पाहत आहेत. भाजप कसा अहंकारी आहे हे लोक पाहत आहेत. अधिवेशन होत नाही. कायदे बदलले जात आहेत. हा काळही निघून जाईल. आम्ही पर्यायी व्यवस्था देऊ.
पहिल्यांदा नॅशनल मीडियात विरोधकांवर टीका होतेय?
आम्ही २०१४ पर्यंत १० वर्षे सत्तेत होतो. तेव्हा देशात काही चुकीचे घडले की काँग्रेसवर आराेप होत. आता आम्ही सात वर्षांपासून विरोधी बाकावर आहोत. अजूनही काँग्रेसवर आरोप केले जातात. म्हणजे सत्तेवर असो किंवा विरोधात... टीका आमच्यावरच होते. हे योग्य आहे का?
जगन रेड्डी, ज्योतिरादित्य, प्रियंका चतुर्वेदी, हेमंत बिस्वा पक्ष सोडून गेले...
मतभेद सोडवता येऊ शकतात. मात्र पक्ष सोडून जाण्याची एखाद्याची इच्छा असल्यास काही करता येत नाही. केंद्रात असूनही उमा भारती, कल्याण सिंह, यशवंत सिन्हांनी भाजप सोडले. पक्षात मनभेद होतो. तो चर्चेतून दूर होऊ शकतो.
आंदोलनावर काँग्रेसची भूमिका?
शेतकरी आंदोलन सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहोत. हाच शेतकऱ्यांचा खरा मुद्दा आहे. आतापर्यंत देशातील २५ पक्षांनी या मुद्द्याचे समर्थन केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.