आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Young People Returning Home In Lockdown Are Painting Attractive Pictures On Village Walls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखा पुढाकार:पर्यटन वाढावे, स्थलांतर थांबावे म्हणून लॉकडाऊनमध्ये घरी परतलेले युवक गावातील भिंतींवर करताहेत आकर्षक पेंटिंग

मनमित | डेहराडून6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुद्रप्रयागमधील अरखुंडचे तरुण टुरिझम हब बनवण्यासाठी राबवताहेत मोहीम

उत्तराखंडात रुद्रप्रयागमधील अरखंुड गावातील अनेक तरुण कोरोना दुष्टचक्रात तरुण बेरोजगार होऊन काही दिवसांपूर्वी महानगरांमधून घरी परतले. मात्र, त्यांनी आशा सोडली नाही. या तरुणांनी डोंगरातील लाेककला, संस्कृती, पर्यावरण आणि ग्रामीण भागाच्या हक्काचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रांनी गावातील प्रत्येक घराची भिंत रंगवली आहे. यामुळे गाव तर सुंदर झालेच, हळूहळू पर्यटकही येथे येऊ लागले. युवकांची इच्छा आहे की, चारधाम यात्रेत त्यांच्या गावाचा सहभाग असावा आणि येथे राहूनच त्यांना रोजगार मिळावा.

रुद्रप्रयागपासून २९ किमीवर अरखुंड गावात १७३ घरे आहेत. लोकसंख्या ८३३. या रंगीत बदलाचे नेतृत्व चित्रकलेत पदव्युत्तर सुमीत राणा करत आहेत. सुमीत यांना लॉकडाऊनमध्ये घरी परतावे लागले. सुमीत यांनी काही तरुणांसोबत देवभूमी उत्तराखंडची संस्कृती आणि पर्यावरण चित्रात रेखाटण्याची योजना आखली. चार हजार रुपये जमवले. त्यातून रंग व इतर साहित्य आणले. सुमीत यांच्यासोबत त्रिलोक रावत, प्रमोद रावत, सूर्यकांत गोस्वामी, नीरज भट्ट आणि आलोक नेगी या युवकांनी काही दिवसांत अरखुंडचे चित्रच बदलून टाकले. तरुणांच्या या प्रयत्नांचे उत्तराखंड सरकारनेही कौतुक केले. राज्याचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांच्यानुसार अशा गावांसाठी लवकरच योजना आखली जाईल.

डाेंगरातील प्रत्येक गाव जोडायचे, म्हणजे कुणी गाव सोडणार नाही

सुमीत सांगतात की, आम्हाला डोंगरातील प्रत्येक गावाला स्वयंरोजगाराशी जोडायचे आहे. रोजगार मिळाला तर सर्व येथेच थांबतील. महानगरांकडे जावे लागणार नाही. लक्ष्मण चौहान सांगतात की, गावात पर्यटन वाढले तर होम स्टे सुरू करणार. हरीश पडियार यांना वाटते की, या बदलामुळे त्यांचे गावही टुरिस्ट हब बनू शकते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser