आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Young People Who Become Paying Guests Suffer From Depression, Anxiety; They Are Four Times More Likely To Be Hunted Than Normal People

गंभीर समस्या:नैराश्य, चिंतेने त्रस्त आहेत पेइंग गेस्ट बनणारे तरुण; ते सामान्य लोकांच्या तुलनेत चारपट शिकार होतात

बंगळुरू6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरापासून दूर शहरांत पेइंग गेस्ट बनणारे तरुण सामान्य लोकांच्या तुलनेत अधिक मानसिक त्रासाचे व व्यसनाचे शिकार आहेत. कर्नाटकातील बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सच्या ताज्या संशोधनातून हा खुलासा झाला. यात १८ ते २९ वर्षे वयोगटातील ३१५ लोकांना समाविष्ट केले होते.

यापैकी १०% लोकांनी डिप्रेशनचा (मेजर डिप्रेसिव्ह एपिसोड) सामना केला. १४% लोकांत चिंता दिसली. तर २०१५-१६ च्या नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हेनुसार, देशात २.८% नैराश्य व ३.५% लोक चिंतेमुळे त्रस्त होते. म्हणजेच पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तरुणांत नैराश्य व चिंतेचा दर सामान्य लोकांच्या तुलनेत चारपट जास्त आहे.

एखादी व्यक्ती दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ दु:ख, कशातही रस नसणे, आत्महत्येचे विचार येणे, अनिद्रा आदी नैराश्येच्या लक्षणांचा सामने करते तेव्हा याला मेजर डिप्रेसिव्ह एपिसोड म्हटले जाते. तर जनरलाइज्ड एंग्झायटी डिसऑर्डरमध्ये व्यक्ती दीर्घकाळ दैनंदिन कामाबाबत चिंतित असते. याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होतो. या दोन्ही स्थितींत व्यक्तीला पुरेसा उपचार घ्यावा लागतो. संशोधनात नैराश्येने पीडित ७२% व चिंतेने पीडित ५९% तरुण कोणत्याच डॉक्टरची मदत घेत नव्हते. अनेकांना याबाबत माहीत नव्हते. संकोचामुळे ते डॉक्टरांकडे गेले नाहीत.

दुसऱ्या शहरात जाणाऱ्या तरुणांत आरोग्य समस्या वाढल्या तरुण शिकणारे किंवा नोकरी करणारे होते. ६५% पदवीपूर्व, पदवी/डिप्लोमा झालेले होते. तर २८% पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते. यापैकी ८८% तरुणांचे लग्न झालेले नव्हते. ९०% लोक दुसऱ्या शहरातून इथे राहण्यासाठी आले होते. संशोधनात ४५ वेगवेगळ्या पेइंग गेस्टमध्ये राहणाऱ्या तरुणांचा समावेश करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...