आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराममता बॅनर्जींना बंगालची सत्ता देण्यासाठी आयपॅकची जी टीम काम करत आहे, त्यामध्ये ऑक्सफोर्ड, कॅम्ब्रिजपासून IIT-IIM मध्ये शिकलेल्या यंगस्टर्सचा समावेश आहे. जास्तीत जास्त जणांचे वय हे 25 ते 35 वर्षांच्या जवळपास आहे. टीम मेंबर्सचे सरासरी वय 25 वर्षे आहे. हे सर्व निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या टीमचा भाग आहेत.
आयपॅकने पश्चिम बंगालमध्ये जून-2019 पासून काम करणे सुरू केले होते. या टीमच्या सल्ल्यावरच अनेक नवीन कॅम्पेन TMC ने लॉन्च केले. कँडीटेट्सच्या घोषणेमध्येही आयपॅकच्या सजेशनला खूप महत्त्व देण्यात आले. ज्या कँडीटेट्सचा परफॉर्मेंस खराब होता, त्यांचे तिकिट कापण्यात आले. आयपॅकच्या एका मेंबरने सांगितले, 'आमच्या टीममध्ये जवळपास प्रत्येक राज्यातून कुणीना कुणी आहेच. वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक आहेत. नॅनो टेक्नॉलॉजीची पारख असणाऱ्यांपासून कायद्याची पारख असणाऱ्यांपर्यंत सर्वच टीममध्ये आहेत. जर्नलिज्मचेही अनेक आहेत.'
ते म्हणतात, 'वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक आहेत, तेव्हाच आम्हाला वेगवेगळे विचार भेटतात, ज्यामधून एखादी चांगली आयडिया समोर येते. पहिले काही फॉरेनर्सही टीममध्ये होते. मात्र बंगालमध्ये जी टीम काम करत आहे, त्यामध्ये कोणताही फॉरेनर नाही.' विशेष म्हणजेच आयपॅकमध्ये वर्किंगग कोणत्याही कंपनीप्रमाणे नाही तर कॉलेजप्रमाणे आहे. म्हणजे आपल्या हिशोबाने या, फक्त आपला जो प्रोजेक्ट आहे, तो योग्य वेळी पूर्ण करा. दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे बंधन सदस्यांवर नाही.
294 विधानसभा आहे, सर्वामध्ये टीमचे सदस्य
पश्मि बंगालमध्ये एकूण 294 विधानसभा जागा आहेत. या सर्वांमध्ये आयपॅकचे मेंबर्स आहेत. कुठे तीन तर कुठे चार सदस्य आहेत. हे लोक स्थानिक उमेदवारासोबत मिळून काम करत आहेत. त्यांना जनतेचा फीडबॅक देतात. सोशल मीडिया कॅम्पेन रन करतात. गर्व्हरमेंटच्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. यासोबतच जे कँपेन पूर्ण प्रदेशात रन केले जात आहेत, ते आपल्या एरियामध्ये रन करतात. या टीममध्ये असे काही सदस्य आहेत, ज्यांनी दिल्ली निवडणुकीत प्रशांत किशोरसोबत काम केले होते. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालचे रणनीतिकार प्रशांत किशोर होते.
टीमच्या एका सदस्याने सांगितले, 'आमच्यात आणि राजकीय पक्षांमध्ये मुख्य अंतर हा आहे की, आमचा कोणताही वयक्तिक स्वार्थ नसतो. आम्ही फीडबैक-फैक्ट्सच्या आधारावर उमेदवाराला योग्य आणि अयोग्य गोष्टी सांगत असतो. मात्र जो नेता पक्षात असतो त्याचा कोणता ना कोणता स्वार्थ असतो. यामुळे ते पक्षाला आपल्या हिशोबाने फिडबॅक देत असतात. बंगालमध्ये आयपॅकचे 700 पेक्षा जास्त सदस्य काम करत आहेत. काही ऑफिस वर्कमध्ये आहेत तर कारी फील्ड वर्कमध्ये आहेत.'
आयपॅकच्या सांगण्यावरुन दीदीने सुरू केला हा प्रोग्राम, 'द्वारे सरकार' सर्वात हिट राहिला
बांग्लास गोरोबो ममता
बांग्लास गोरबो ममता म्हणजेच बंगालचा गौरव ममता. हा एक पब्लिक आउटरीच प्रोग्राम आहे. याचा उद्देश राज्याच्या अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांना दीदींशी जोडणे हा आहे. 2 मार्चपासून सुरू झालेले हे कँपने 10 मेपर्यंत चालेल. पक्षाचे 75 हजारांपेक्षा जास्त नेते, 5 लाख कार्यकर्ते 21 हजारांपेक्षा जास्त मीटिंग करतील. संपूर्ण बंगालमध्ये 41 हजार किमी यात्रेचे लक्ष्य आहे. या कँपेन अंतर्गत अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे.
दीदी के बोलो
दीदी के बोलो म्हणजे आपल्या बहिणीला बोला. या प्रोग्राम अंतर्गत लोक आपली तक्रार ऑनलाइन दाखल करु शकतात. टोल फ्री नंबरच्या माध्यमातून सरकारला आपला सजेशन देऊ शकतात. यामध्ये पक्षाचे लीडर्स गावात जात आहेत. ग्रामिण लोकांसोबत भोजन करत आहे. यामध्ये कमीत कमी 10 हजार गावांना कव्हर करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
दीदीर दूत
दीदीर दूत नावाचे एक मोबाईल अॅप्लीकेशन लॉन्च करण्यात आले आहे. 20 दिवसांमध्येच 5 लाख वेळा डाउनलोड करण्यात आले होते. हा देखील दीदींशी कनेक्ट होण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये सीएमचे भाषण, न्यूज आणि इंफोग्राफिक्स शेअर केले जातात. त्यांचे सर्व इव्हेंट्स, अॅक्टिव्हिटीज येथे पाहता येऊ शकतात.
द्वारे सरकार
या प्रोग्रामचे लक्ष्य लोकांच्या घरांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या दूर करणे आणि सरकारी स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे आहे. विशेषतः यामध्ये 11 स्कीम्स ठेवण्यात आल्या आहेत. जसे स्वास्थ्य साथी, कन्या साथी, कन्याश्री. लोकांचे आरोग्य कार्ड पंचायत स्तरावर बनवले गेले. जातीचे दाखले देण्यात आले. जनतेच्या सर्व समस्या द्वारे सरकारच्या माध्यमातून संपल्या आहेत. ही एक अत्यंत यशस्वी मोहीम मानली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.