आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात गरजू लोकांना वैद्यकीय मदत पुरवणारे युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांची दिल्ली गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सुमारे अर्धा तास चौकशी केली आहे. दरम्यान, कोरोना काळात वाटप करण्यात आलेले औषधे, वैद्यकीय उपकरणे कोठून आणले असा सवाल गुन्हे शाखेने उपस्थित केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही कारवाई दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे, या कारवाईवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे हल्ला केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावर हँडलवरुन #IStandWithIYC असे ट्विट केले असून वाचवणारा नेहमीच मारणार्यांपेक्षा मोठा असल्याचे त्यांनी लिहले. पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनीही ट्विट करत श्रीनिवास यांची बाजू घेतली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये 'मदत करणारे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांना रोखणे हा मोदी सरकारचा भयानक चेहरा आहे. अशा भयानक सुडाच्या कृत्याने आम्ही घाबरणार नाही किंवा आपला आत्मा मोडणार नाही. यामुळे सेवा करण्याचा निर्धार अधिक दृढ होईल.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.