आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Youth Dies Of Heart Attack In Saibaba Temple MP Video | Bowed His Head Before Sai And Did Not Rise Again

साईंसमोर डोके टेकवले आणि पुन्हा उठलाच नाही:मंदिरात तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील कटनी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा मंदिरातच मृत्यू झाला. मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी तो खाली वाकला आणि त्याला पुन्हा उठता आले नाही. तो बराच वेळ त्याच स्थितीत बसला. लोकांनी जवळ जाऊन पाहिलं तर तो मरण पावला होता. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.

ही संपूर्ण घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ शनिवारी समोर आला. राकेश मेहाणी (42) असे मृताचे नाव असून, तो संत नगर येथे राहत होता. गुरुवारी सायंकाळी साई मंदिरात दर्शनासाठी गेले होता. कुठाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहारुआ कृषी उत्पन्न मार्केटमध्ये साईबाबांचे हे मंदिर आहे.

व्हिडिओमध्ये घटना कैद
मंदिराच्या गर्भगृहात साईबाबांच्या प्रतिमेला प्रदक्षिणा घालताना राकेश मेहाणी दिसत आहे. प्रदक्षिणा केल्यानंतर, तो आपले डोके टेकवून साई बाबांसमोर बसतो. तो बराच वेळ या मुद्रेत बसतो. कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून मंदिर व्यवस्थापनाचे सदस्य त्याच्याकडे येतात आणि त्याला हलवून बघतात, पण शरीरात हालचाल होत नाही. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

डॉक्टर म्हणाले - हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची शक्यता
कुटुंबीयांनी राकेशचे शवविच्छेदन करून घेतले नाही. त्यामुळे मृत्यूचे खरे कारण समजू शकले नाही. मृत्यूचे संभाव्य कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राकेश हा भाड्याच्या घरात राहत होता
मृत राकेश मेहाणी यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, तो संत नगर येथे भाड्याच्या घरात राहत होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मेडिकलच्या दुकानात काम करायचे. राकेश विवाहित असून त्याला एक लहान मुलगी आहे. राकेश हा साईभक्त होता, तो दर गुरुवारी साई मंदिरात जात असे. या गुरुवारीही दुकानाचे काम आटोपून ते सायंकाळी दर्शनासाठी पोहोचले. जिथे मृत्यू झाला.

मंदिराच्या पुजाऱ्याने ही माहिती दिली...
मंदिराचे पुजारी प्रदीप कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, राकेश मेहाणी गुरुवारी मंदिरात आले होते, ते दर गुरुवारी साई मंदिरात जात असत. आल्यावर त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मूर्तीची प्रदक्षिणा केली. परिक्रमेनंतर त्यांनी मस्तक टेकवले. सुमारे एक मिनिटानंतरही उठला नाही तेव्हा मंदिरात उपस्थित भाविकांनी तो उठत नसल्याचे सांगितले, त्यानंतर मी तेथे गेलो, पण त्याच्या शरीरात काहीच हालचाल होत नव्हती, तोंडाला पाणीही आले होते, पण तो उठला नाही. त्यानंतर इतर लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...