आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात जी तरुणाई महाविद्यालयात शिकत होती. ते दोन वर्षे कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत. परिणामी त्यांना कॉलेजचा मित्र होऊ शकला नाही. आता ही २६ वर्षे वयापर्यंतची तरुणाई नोकरी करत आहे.
यापैकी काही रिमोट वर्किंग तर काही कार्यालयात जाऊ लागले आहेत. मात्र, कार्यालयात त्यांना तुटक संबंध जाणवत आहेत. आपल्यातील एकाकीपणा दूर करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाद्वारे मित्र बनवण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्याशीही जवळीक निर्माण करू शकत नाहीत. ही तरुणाई मैत्रीच्या समस्येतून जात आहे. मित्र बनवणे त्यांना काम करण्यासारखे वाटत आहे. त्यांना जास्त सामाजिक हाेता येत नाही. मिलेनियल्स पिढीच्या(२७ ते ४२ वर्षे) लोकांमध्ये जो मैत्रीचा भाव आहे तसा या नव्या पिढीमध्ये विकसित होत नाही. मार्केट रिसर्च संस्था टॉक शॉपीचे वरिष्ठ संशोधन व्यवस्थापक जाॅयस चुइन्कम म्हणाले, महामारीत लोकांत मिसळणे कमी झाले. परिणाम जेन झेड युवा मैत्री करण्याची पद्धत शिकू शकले नाहीत. नात्यातील ही कमतरता कोणत्याही सुस्थितीस इजा पोहोचवू शकते. मात्र, जेन झेडसाठी या पेक्षा वाईट वेळ होऊ शकत नाही. ते जीवनातील अत्याधिक बदलाचा सामना करत आहेत. संशोधकानुसार, सर्व प्रकारचे बदल युवांसाठी आवश्यक आहेत. यामुळे त्यंाना नव्या ठिकाणी मिसळण्यात मदत मिळते.
मित्र शोधण्यासाठी सर्जनशील पद्धत शोधली जाते आता तरुणाई मित्र शोधण्यासाठी सर्जनशील पद्धत अवलंबत आहेत. अॅपच्या माध्यमातून मित्र बनवत आहेत. याला तिसरे जग म्हटले जात आहे. कारण, हे काम आणि घरापेक्षा वेगळे, एक आभासी जग आहे. यात ऑनलाइन ते चॅटिंग करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.