आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Youths March With Bhindranwale Posters In Front Of Police At Golden Temple, Amritsar

खलिस्तानचे समर्थन:सुवर्णमंदिरात पोलिसांसमोर खलिस्तानच्या घोषणा, भिंद्रनवालेच्या पोस्टरसह युवकांनी काढली मिरवणूक

अमृतसरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ३८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोमवारी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात झालेल्या सभेत खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तेव्हा तेथे पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था होती.

श्री अकाल तख्त साहिबचे जथ्थेदार ज्ञानी हरप्रीतसिंग यांनी शिखांना आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले. त्यासाठी शूटिंग रेंज तयार करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या वेळी अकाल तख्त साहिब येथे अखंड पाठ झाला आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टारदरम्यान मारल्या गेलेल्या शिखांच्या कुटुंबांना सन्मानित करण्यात आले.

सुवर्णमंदिर परिसरात खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या. काही तरुणांनी खलिस्तानी अतिरेकी जरनैलसिंह भिंद्रनवालेचे छायाचित्र असलेले टी-शर्ट घातले होते. ‘लेकर रहेंगे आजादी’ अशी घोषणाही देण्यात आली. तत्पूर्वी, रविवारी दल खालसातर्फे घल्लूघारा स्मृती स्वातंत्र्य मार्च काढण्यात आला हाेता, तेथेही हाच प्रकार घडला हाेता.

बातम्या आणखी आहेत...