आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूट्यूबने संसद टीव्ही केली बंद:हॅकर्सने नाव बदलून Ethereum केले, रात्री 1 वाजता अनधिकृत लाइव्ह स्ट्रीमिंग करुन मोडली गाइडलाइन्स

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलच्या सोशल व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने संसद टीव्हीचे ऑफिशियल अकाउंट बंद केले आहे. यूट्यूबवर संसद टीव्हीचे चॅनल उघडल्यावर त्यावर 'हे अकाउंट यूट्यूबच्या कम्यूनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्याबद्दल बंद करण्यात आले आहे' असा मॅसेज मिळत आहे. आता संसद टेलिव्हिजनचे संयुक्त सचिव पुनीत कुमार यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की हॅकर्सनी चॅनल हॅक करून यूट्यूबची गाइडला मोडली आहे.

खाते हॅक केले आणि Ethereum नाव दिले
संसद टेलिव्हिजनचे संयुक्त सचिव पुनीत कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 15 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री उशिरा 01:00 वाजता संसद टीव्हीच्या चॅनेलवर एक अनधिकृत अॅक्टिव्हिटी (लाइव्ह स्ट्रीमिंग) करण्यात आली. हॅकर्सनी चॅनेलचे नाव बदलून Ethereum ठेवले. त्यामुळे आपल्या चॅनलवर बंदी घालण्यात आली आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने या अलर्टची माहिती दिली. आमची टीम चॅनल पुन्हा अॅक्टिव्ह करण्यासाठी काम करत आहे.

क्रिएटरसाठी यूट्यूबची पॉलिसी काय म्हणते?
गूगलने यूट्यूब कंटेट क्रिएटर आणि चॅनेल चालवणाऱ्यांसाठी एक धोरण तयार केले आहे, जे त्याच्या support.google.com वर दिलेले आहे. या धोरणानुसार, जर तुम्ही YouTube वरून कमाई करत असाल, तर तुमच्या चॅनलने YouTube वरील कमाईशी संबंधित धोरणाचे पालन करणे आवश्यक आहे. पॉलिसीमध्ये YouTube ची कम्यूनिटी मार्गदर्शक तत्त्वे, सर्व्हिसच्या कंडीशन, कॉपीराइट आणि Google Adsense कार्यक्रम धोरणे समाविष्ट आहेत. ही पॉलिसी 'यूट्यूब पार्टनर कार्यक्रमात' सहभागी असलेल्या किंवा सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना लागू होतात.

  • तुम्हाला तुमच्या व्हिडिओंवर जाहिराती दाखवण्याची सेवा चालू करून पैसे कमवायचे असतील, तर त्यांनी जाहिरातदारांच्या दृष्टिकोनातून चांगले व्हिडिओ बनवण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
  • तुम्ही प्रत्येक पॉलिसी नीट वाचल्याची खात्री करा, कारण ही धोरणेच ठरवतात की चॅनेलवर कमाई केली जाऊ शकते की नाही.
  • यूट्यूब समीक्षक हे नियमितपणे पाहत राहतात की, कमाई केलेले चॅनेल या धोरणांचे पालन करत आहेत की नाही. ते धोरण कसे राबवतात याच्या तपासाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी.

तुम्ही यूट्यूबच्या कम्यूनिटी गाइडलाइन फॉलो केल्या नाही तर काय होईल?
कम्यूनिटी गाइडलाइनचे उल्लंघन करणारे व्हिडिोतून कमाई करु शकणार नाहीत. त्यांना प्लॅटफॉर्मवरुन हटवले जाईल. YouTube वर कमाई करणार्‍या क्रिएटर हे लक्षात ठेवले पाहिजे की मार्गदर्शक तत्त्वे संपूर्ण चॅनेलवर लागू होतात, केवळ विशिष्ट व्हिडिओवरच लागू होत नाहीत. अशा परिस्थितीत क्रिएटरने या सर्व गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही कंटेंट क्रिएटर म्हणून YouTube च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, तर तुम्ही केवळ त्या व्हिडिओमधून पैसे कमवू शकणार नाही, तर तुमच्या चॅनेलवरही बंदी घातली जाईल. त्यानंतर जोपर्यंत त्याचे रिव्ह्यू होत नाही तोपर्यंत त्यावर बंदी राहील. यूट्यूब त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल खूप कठोरपणा दाखवते.

बातम्या आणखी आहेत...