आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रीलच्या नादात गेला जीव:300ची स्पीड, हेल्मेटच्या उडाल्या ठिकऱ्या, एक्सप्रेस-वेवर VIDEO शूट करताना यूट्यूबरचा भयंकर अपघात

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशच्या अलीगड जिल्ह्यातील टप्पल येथे यमुना एक्सप्रेस-वेवर एक यूट्यूबर ताशी 300 किमी वेगाने दुचाकी चालवत होता. त्याची दुचाकी अचानक दुभाजकला धडकली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

प्राप्त माहितीनुसार, यूट्यूबर अगस्त्य आपल्या रेसिंग बाइकवरून आग्र्याहून दिल्लीला जात होता. रस्त्यात त्याची दुचाकी अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली. यूट्यूबरने हेल्मेट घातले होते. पण प्रचंड वेगामुळे तो वाचला नाही. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याने घटनास्थळीच अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध होता यूट्यूबर अगस्त्य चौहान

मृत अगस्त्य चौहान दिल्लीचा रहिवासी होता. तो यूट्यूब चॅनल चालवायचा. त्यासाठी तो व्हिडिओ बनवत असे. यूट्यूबवर त्याचे कोट्यवधी चाहते व लाखो सबस्क्रायबर्स आहेत. यूट्यूबर अगस्त्य चौहान बाईक चालवताना प्रोफेशनल व्हिडिओ बनवत असे. त्याने आपल्या व्हिडिओमध्ये एक डिस्क्लेमरदेखील टाकला होता. वेगाने गाडी चालवू नका, असा इशारा त्याने दिला होता.

लॉन्ग राइड स्पर्धेत घ्यायचा भाग

यूट्यूबर (Youtuber) अगस्त्य चौहान दिल्लीत होणाऱ्या लाँग राइड स्पर्धेत भाग घेण्यासाठी जात होता. त्याने आपली रेसिंग बाइक ताशी 300 किमी वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला होता. तो दुचाकी चालवताना व्हिडिओही तयार करत होता.

300 ची स्पीड, दुचाकीवर गेला तोल अन् जीवही

अगस्त्यने यमुना एक्सप्रेसवेवर पहिल्यांदा 300च्या वेगाने रेसिंग बाइक चालवली, त्याला बाइक सांभाळता आली नाही. यादरम्यान डिव्हायडरला धडकल्याने अगस्त्यचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.