आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली पोलिसांनी एका उद्योगपतीला हनीट्रॅपमध्ये अडकवून तब्बल 80 लाख उकळणाऱ्या एका यूट्यूबरला अटक केली आहे. नमरा कादिर नामक या यूट्यूबरने प्रायव्हेट कंपनीच्या मालकाला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती.
कादिरला सोमवारी दिल्लीतून अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे तिला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कादिरचा पती व या प्रकरणातील सह आरोपी मनीष उर्फ विराट बेनीवाल फरार आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, कादिरने आपला गुन्हा कबूल केला आहे. ती सध्या रिमांडवर आहे. तिने उद्योगपतीकडून उकळलेले पैसे व सामान हस्तगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिच्या पतीचाही लवकरच शोध घेऊन अटक केली जाईल.
कादिरचे यूट्यूबवर 6.17 लाख सब्सक्रायबर्स
22 वर्षीय नमरा कादिरचे यूट्यूबवर 6.17 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. तिच्याविरोधात बादशाहपूरच्या 21 वर्षीय दिनेश यादवने ऑगस्टमध्ये तक्रार दाखल केली होती. पम कादिर व तिच्या पतीने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली.
कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांच्याविरोधात नोएडा सेक्टर 50 च्या पोलिस ठाण्यात 26 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात कादिर व बेनीवाल दिल्लीच्या शालीमार गार्डनमध्ये राहणारे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
स्वतःच्या चॅनेलवर बिझनेस प्रमोट करत होती कादिर
जाहिरात फर्म चालवणाऱ्या दिनेश यांनी पोलिसांना सांगितले की, काही महिन्यांपूर्वी तो कादिरच्या संपर्कात आला. तेव्हा बेनीवालही तिच्यासोबत होता. कादिरने आपल्या यूट्यूब चॅनेलवर माझ्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी केली.
दिनेशने सांगितले - काही दिवसांनंतर कादिरने माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आमची चांगली मैत्री झाली. गत ऑगस्ट महिन्यात मी कादिर व मनीष सोपबत एका क्लबमध्ये गेलो. तिथे रात्री एक खोली बूक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कादिरने माझे सर्वच बँक कार्ड व स्मार्ट वॉच मागितली. तसेच आपली मागणी पूर्ण न केल्यास बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
दिनेशच्या मते, त्या दोघांनी मिळून आपल्याकडून 80 लाख रुपयांहून अधिकची रकम व भेटवस्तू उकळल्या. या प्रकरणाची माहिती मी माझ्या वडिलांना दिली असता त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.