आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगणात गुरूवारी YSR तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वाय एस शर्मिला यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांना एका बॉक्समध्ये ठेवलेले जोडे दाखवले. तर त्यांना प्रजाप्रस्थान यात्रेत सहभागी होण्याचे आव्हान केले. त्या म्हणाल्या की, जोडे घातल्यावर त्यांना चालण्यास सोपे जाईल आणि त्यांना लोकांच्या समस्या समजतील. असा घणाघात करत त्यांनीे केसीआर यांना आव्हान दिले.
आंध्रप्रदेशातून वेगळे झालेल्या तेलंगणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत YSR तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वाय. एस. शर्मिला यांनी मुख्यमंत्री KCR विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शर्मिला यांनी राज्यात प्रजा प्रस्थान पदयात्रा काढली आहे. त्या आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. आर. यांच्या कन्या आणि विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण आहे. शर्मिला यांनी 2021 मध्ये YSRTP पक्षाची स्थापना केली.
गतवर्षी त्यांच्या ताफ्यावर हल्ला, यात्रा स्थगित केली होती
गेल्यावर्षी त्यांच्या ताफ्यावर झालेल्या कथित हल्ल्यानंतर ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. गुरुवारी नरसंपेठ येथून ही यात्रा पुन्हा सुरू झाली. प्रवासाला सुरूवात करताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा शर्मिला यांनी मुख्यमंत्री केसीआर यांना सोबत चालण्याचे आव्हान केले. त्या म्हणाल्या की, केसीआर तेलंगणाला सुवर्ण राज्य असल्याचा दावा करतात. हे खरे असेल तर मी राजकारणातून सन्यांस घेईल, जर खोटे ठरले तर केसीआर यांना राजीनामा द्यावा लागेल. राज्यातील जनतेची माफी मागावी लागेल आणि एका दलित समाजातील नेत्याला मुख्यमंत्री करावे लागेल.
गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरला तेलंगणा पोलिसांनी शर्मिला यांची कार क्रेनच्या साह्याने बाजूला काढली होती. त्यावेळी शर्मिला या कारमध्ये बसलेल्या होत्या. कार टोइंग केल्यानंतर शर्मिला यांनी केसीआर यांच्या विरोधात घोषणा दिली होती. काही लोकांनी शर्मिला यांच्या पदयात्रेसोबत चालणारी प्रचार बस पेटवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी शर्मिला यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरच कारवाई केली होती. यानंतर त्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करण्यासाठी आली होती. यावर पोलिसांनी शर्मिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.
यात्रा रोखल्याचा आरोप, रस्त्यावरच धरणे आंदोलन
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शर्मिला यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर पदयात्रा थांबवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे रस्त्यावर धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. म्हणाल्या होत्या की - मी तेलंगणातील लोकशाहीच्या रक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहे. मला माझी पदयात्रा करण्याची परवानगी द्यावी.
जीवाला धोका असल्याचे सांगितले होते
शर्मिला यांनी सप्टेंबरमध्ये तिचे वडील आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री डॉ वायएस राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूमागे कट असल्याचा आरोप केला होता. तेलंगणात पदयात्रेला निघालेल्या शर्मिला यांनी दावा केला होता की, तिलाही मारण्याची योजना आखली जात होती.
महबूबनगरमध्ये शर्मिला म्हणाल्या होत्या- वायएस राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू हा एका कटा भाग आहे. मलाही मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी लक्षात ठेवावे की, मी वायएसआरची मुलगी असून निडर आहे. राजशेखर रेड्डी यांचे डिसेंबर 2009 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. काही महिन्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.