आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी मृत्यूला घाबरत नाही. आपणा सर्वांना एक ना एक दिवस या जगातून जायचेच आहे. त्यामुळे काेणत्याही प्रकारची झेड सिक्युरिटी नकाे आहे. आता मतदारच आगामी निवडणुकीदरम्यान बॅलेज पेपरमधून माझ्यावर झालेल्या बुलेट हल्ल्याला चाेख प्रत्त्युतर देणार आहे, अशा शब्दात
एआयएमआयएमचे नेता आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लाेकसभेत कडक शब्दात आपला संताप व्यक्त केला. दाेन दिवसांपुर्वीच प्रचारासाठी नाेएडाकडे रवाना हाेत असताना आेवेसी यांच्या गाडीवर गाेळीबार झाल्याची घटना घडली. त्यामुळे त्यांनी या जीवघेण्या हल्ल्याबाबत लाेकसभेत चर्चा केली. तसेच यादरम्यान त्यांनी राेष व्यक्त केला. यादरम्यान त्यांना लाेकसभा सभापती यांनी बाेलण्यास मनाई केली हाेती. मात्र, यावरही ओवेसी यांनी आपला संताप व्यक्त केला.
‘मी याठिकाणी काहीही बाेलणार नाही तर कुठे बाेलू शकेल. मला स्वत:च्या भावना व्यक्त करण्याची परवानगी देण्यात यावी. माझ्यावर हल्ला करण्यात आला. आता निवडणुकीतच याला उत्तर मिळेल, असेही ते म्हणाले.
मोदी सरकारने दिली होती Z सुरक्षा
शुक्रवारी यूपीच्या हापूरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर गृह मंत्रालयाने असदुद्दीन ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. यामध्ये ओवेसींच्या सुरक्षा वर्तुळात सीआरपीएफचे जवान असतील. म्हणजेच 4 ते 6 NSG कमांडो आणि पोलीस कर्मचार्यांसह 22 जवान आता ओवेसींच्या झेड श्रेणीच्या सुरक्षेत तैनात असतील.
दुसरीकडे पोलिसांनी शुभम आणि सचिन या दोन हल्लेखोरांना शुक्रवारी हापूर न्यायालयात हजर केले. दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हल्लेखोर सचिन हा भाजपचा कार्यकर्ता असून, शाहीन बागेत गोळीबार करणाऱ्या गोपाल शर्माचा समर्थक आहे.
धर्मविरोधी भडकाऊ भाषणांमुळे हल्ला : ADG
राज्याचे ADG कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आरोपींनी 2013-14 दरम्यान अयोध्येतील राम मंदिराबाबत ओवेसींच्या धर्मविरोधी भाषणामुळे आणि वक्तव्यामुळे दुखावल्यानंतर ही घटना घडवून आणली. सध्या मेरठ रेंजचे आयजी प्रवीण कुमार हापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.
कारवर तीन गोळ्या लागल्या होत्या
मेरठ आणि किथोरे येथे पदयात्रा करून ओवेसी ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५.३० वाजता NH-24 मार्गे दिल्लीला परतत होते. हापूर जिल्ह्यात पिलखुवा पोलिस स्टेशनच्या छिजारसी टोल प्लाझावर आधीच उभ्या असलेल्या दोन तरुणांनी ओवेसींच्या गाडीवर गोळीबार केला. त्यांच्या कारला तीन गोळ्या लागल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.