आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Zharkhand: Swallowed By 12 Mountain Mining Mafias More Than 100 Million Years Old; News And Updates

झारखंड:10 कोटी वर्षांहून अधिक प्राचीन 12 डोंगर खाण माफियांनी केले गिळंकृत

रांचीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे डोंगर नष्ट : गदवा-नासा, अमजोला, पंगडो, गुरमी, बोरना, धोकुटी, बेकचुरी, तेलियागडी, बांसकोला, मोराकुट्टी

झारखंडमधील चार जिल्हे-दुमका, गोड्डा, पाकुड आणि साहिबगंजपर्यंत पसरलेल्या १० कोटी वर्षे जुन्या राजमहाल पर्वत श्रृखंलेतील १२ डोंगर गायब झाले आहेत. ते हिमालयापेक्षा ५ कोटी वर्षे आधी तयार झाले, मात्र त्यांचे अस्तित्व संपण्यास काहीच वर्षे लागली. गदवा- नासा, अमजोला, पंगडो, गुरमी, बोरना, धोकुटी, बेकचुरी, तेलियागंडी, बांसकोला, गडी, संुदरपहाडी, मोराकुट्टी डोंगरांचे अस्तित्व खाण माफियांनी अवैध खोदकाम करत नष्ट केले आहे. साहिबगंजच्या पीजी महाविद्यालयात भूगर्भशास्त्राचे प्रा. डॉ. रंजित प्रसाद सिंह यांच्यानुसार, खूप जास्त खणन झाल्याने गदवा डोंगराचे अस्तित्व गेल्या १७ वर्षांत नष्ट होण्याच्या तयारीत आहे. नुकतेच झारखंडमध्ये अवैध खणनच्या बातम्या आल्यानंतर भास्कर ग्राउंड झीरोवर गेला. , नियम धाब्यावर बसवून खाण माफिया गदवाच्या उर्वरित भागात रात्रंदिवस खोदकाम करत आहेत. त्यांना खाण विभाग, पोलिस- प्रशासनाचे अधिकारी मदत करत आहेत. साहिबगंजचे डीसी रामनिवास यादव यांना विचारले असता, उलट त्यांनी आमच्याकडूनच अवैध उत्खननाचे पुरावे मागितले. येथे येऊन पुरावे देण्याचे सांगितले. जिल्हा टास्क फोर्स छापेमारी करत अाहेत.

कारवाईचा देखावा
एनजीटीच्या अहवालातही राजमहालच्या डोंगरांवर अवैध खणनाबाबतचा गोंधळ उघडकीस आला आहे.

खेळ समजून घ्या... दगड कापून कशा प्रकारे यंत्रणा पोखरताहेत खाण माफिया
१. लीज रद्द, न्यायालयात सुनावणी झाली सुरू

बांसकोलामध्ये गदवा मौजातील प्लॉट ६०, ६१, ६२ ची ५.७६ एकरची लीज जयराम दास यांना १८ ऑगस्ट १९९९ पासून १० वर्षांसाठी देण्यात आली. मात्र मोती धबधबा आणि औषधी वनस्पती वाचवण्यासाठी लीज रद्द करण्यात आली. उपायुक्त कोर्टात सुनावणी सुरू झाली. तिकडे भूखंडावर मोहन अँड संजय स्टोन वर्क्सचा फलक लागला.

२. डोंगर भुईसपाट, आता पाताळात जात आहेत
राजमहाल डोंगर श्रृखंलेवर खणन करण्यासाठी १८४ जणांना लीज मिळाली आहे. माफियाही अवैध खणन करत आहेत. सीमांकनाची तपासणी न केल्याने अनेक पट खणन होत आहे. यामुळेच गदवा डोंगर तर शिवलिंगाच्या आकारात शिल्लक आहे. माफियांनी डोंगर आता जमीन खोदून पाताळात जात आहेत.

गदवा डोंगरावर शिवलिंगसारखी आकृती खाण माफियांचे प्रेम... डोंगर पोखरून तयार केला आकार

सदस्यांना खाणीपर्यंत जाण्याआधीच रोखले, ट्रक लावून रस्ता रोखला
जिल्हा खाण अधिकाऱ्याने समितीला माहिती देताना सांगितले की, सुंदरा मौजात काही अवैध दगड खाणींवर कारवाई करण्यात आली. पथक तेथे गेले असता रस्त्यातच एक ट्रक उभा करून रस्ता बंद करण्यात आला. तेथे एक- दोन जण उपस्थित होते, पण ट्रकचालक मात्र उपस्थित नव्हता.

अरवलीनंतर सर्वात जुना डोंगर

  • कार्बन डेटिंगच्या नुसार राजमहाल श्रृंखला १० कोटी, हिमालय ५ कोटी, तर अरवली ५७ कोटी वर्षे जुनी
  • राजमहल पर्वत शृंखला ज्वालामुखी स्फोटामुळे तयार झाली आहे
  • ती २६०० चौरस किलोमीटर पसरली असून तिची सर्वाधिक उंची ५६७ मीटर आहे.
बातम्या आणखी आहेत...