आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:झायडस कॅडिलाने भारतात लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मागितली

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

झायडस कॅडिलाने झायकोव्ह-डी या आपल्या लसीच्या भारतातील आपत्कालीन वापरास औषध महानियंत्रकांकडे मंजुरी मागितली आहे. या लसीला परवानगी मिळाली तर वयस्कर लोकांसह १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनाही लसीकरण होऊ शकणार आहे. कोव्हॅक्सिननंतर झायकोव्ह-डी ही दुसरी स्वदेशी व जगातील पहिली डीएनए आधारित लस आहे.

देशात प्रथमच एखाद्या देशी कंपनीने १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लस देण्यासंबंधी परवानगी मागितलेली आहे. आतापर्यंत फक्त अमेरिकेत या वयोगटात लस दिली जात आहे. कॅडिला हेल्थकेअरचे संचालक डॉ. शर्विल पटेल यांनी सांगितले, या लसीचे सुरुवातीला ३ डोस असतील. पहिल्या डोसनंतर २८व्या दिवशी दुसरा व तिसरा डोस ५६ व्या दिवशी दिला जाईल.

बातम्या आणखी आहेत...